Kirit Somaiya/Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

मुख्यमंत्र्यांसह पत्नी आणि मुलांनीही मनी लाँडरिंग केलं; सोमय्यांचा गंभीर आरोप

येत्या दोन दिवसात अनिल परबांची केस दापोली कोर्टात येणार आहे. तर हसन मुश्रीफ यांचे इन्वेस्टिगेशन सुरु आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : ठाकरे सरकारचे डर्टी डझन घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा भाजपनेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिला आहे. आयएनएस विक्रांत निधीचा अपहार केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर, गायब असणारे सोमय्या आज मुंबईत परतले. यावेळी त्यंनी नेहमीप्रमाणे शिवसेनेवर टीका करत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपलं तोंड बंद करु शकत नाहीत असही सोमय्या म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना सोमय्या म्हणाले, 'संजय राऊत फक्त प्रवक्ते आहेत, मला अटक करण्याचा मास्टर प्लॅन उद्धव ठाकरेंचा आहे. तेच मास्टरमाईंड आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पोरांचा, पत्नीचे घोटाळे मी बाहेर काढले म्हणून काहीही करा आणि मला अटक करा असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला होता. मात्र, आता न्याय मिळायला सुरुवात झाली आहे. असं म्हणत त्यांनी यावेळी मुंबई उच्च न्यायलायाच्या न्यायाधिशांचे आभारहा मानतो.

हे देखील पहा -

ते पुढे म्हणाले, येत्या दोन दिवसात अनिल परबांची (Anil Parab) केस दापोली कोर्टात येणार आहे. तर हसन मुश्रीफांचं इन्वेस्टिगेशन सुरु आहे. यशंवंत जाधव त्याबरोबर नंदकिशोर चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरेंसह त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत मनी लॉंडरिंग केलं असल्याचा गंभीर आरोपही सोमय्यांनी केला. तसंच हे उद्धट सरकार सोमय्याला तोंड बंद करु शकत नाही असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे महापालिकेच्या मतदार यादींवर हरकतींचा पाऊस

स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवारांची तोफ धडाडली, महाराष्ट्र पिंजून काढला

Raigad Politics: राष्ट्रवादी-शिवसेना संघर्ष टोकाला; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलावर गुन्हा दाखल

IND vs SA ODI: डोंगराएवढी धावसंख्या करूनही टीम इंडियाचा दारूण पराभव; दक्षिण आफ्रिकेची मालिकेत १-१ ने बरोबरी

आजारपणामुळे ब्रेक घेतलेल्या संजय राऊतांची भेट! कोणकोणत्या राजकीय नेत्यांकडून विचारपूस?

SCROLL FOR NEXT