Molestation Crime Of Minor Girl In Thane विकास काटे
मुंबई/पुणे

Thane: अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक; मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिले होते आदेश

Molestation Crime Of Minor Girl In Thane: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेत आरोपीला शोधण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

ठाणे: एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation) करुन तिच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या दिनेश गड (३२, रा. मनोरमानगर, ठाणे ) याला मोठ्या कौशल्याने चितळसर (Thane) पोलिसांनी अटक केली आहेआहे. परिसरातील ३५ ते ४० सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केल्यानंतर त्याचा शोध घेण्यात यश आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. (Thane Crime News)

हे देखील पाहा -

ठाण्यातील घोडबंदर रोड, लॉकीम कंपनीच्या समोरील स्कायवॉकवरुन आर मॉलच्या दिशेने ही १७ वर्षांची मुलगी ११ ऑगस्टला सकाळी ६.२५ ते ६.३० च्या सुमारास जात होती. त्याचवेळी आरोपीने तिच्या पाठीमागून येऊन जबरदस्तीने तिचा विनयभंग केला. या झटापटीत मोठ्या धाडसाने त्याला प्रतिकारासाठी अल्पवयीने मुलीने आरोपीच्या गालावर चावा घेऊन स्वत:ची सुटका करून घेतली.

तिने याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाखाली त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीचे वर्णन, नाव, पत्ताही नव्हता, त्यामुळे त्याचा शोध घेण्याचे मोठे आव्हान होते. त्यात सोशल मीडियातूनही हे प्रकरण मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही हे प्रकरण गांभीर्याने घेत आरोपीला शोधण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. पोलीस निरीक्षक आर. बी. भिलारे यांनी आरोपीच्या शोधासाठी एक पथक तयार केले. खबरे, तांत्रिक तपास आणि वेगवेगळ्या ठिकाणच्या सुमारे ३५ ते ४० सीसीटीव्ही फुटेजद्वारे तसेच आरोपीची शरीरयष्टी व त्याची चालण्याची लकब यावरुन दिनेश याला मनोरमानगर भागातून १५ ऑगस्टला मध्य रात्री १ च्या सुमारास अटक केली गेली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप उमेदवाराच्या मुलाची अजित पवारांच्या कार्यकर्त्याला मारहाण, VIDEO

Maharashtra Live News Update : नवी मुंबई विमानतळाला दि.बा पाटील यांचं नाव देणार- मुख्यमंत्री

एकेकाळची ‘नॅशनल क्रश’ अभिनेत्री शिवसेनेची मशाल घेऊन मैदानात, ठाकरेंसाठी मुंबईत दारोदारी करतेय प्रचार

Viral Video: भारतात राहणाऱ्या विदेशी व्यक्तीने २ महिन्यांनी साफ केला एअर प्युरीफायर, फिल्टरच्या आता जे दिसलं....!

४ नव्या अमृत भारत ट्रेन प्रवाशांच्या सेवेत; महाराष्ट्रासहित ४ राज्यांना होणार फायदा, मार्ग आणि वेळापत्रक कसे असेल?

SCROLL FOR NEXT