Rahul Gandhi On Modi Saam Tv
मुंबई/पुणे

Rahul Gandhi On Pm Modi: मोदींनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली होती, जे ब्रिटिशांना जमले नाही ते यांना कसं जमेल: राहुल गांधी

Rahul Gandhi Latest News: मोदींनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली होती, जे ब्रिटिशांना जमले नाही ते यांना कसं जमेल: राहुल गांधी

Satish Kengar

>> रुपाली बडवे

Rahul Gandhi In Mumbai: ''मोदी आले तेव्हा त्यांनी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली होती. मात्र जे ब्रिटिशाना जमले नाही ते यांना कसं जमेल'', असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले आहेत. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी टिळक भवनात भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते असं म्हणाले आहेत.

राहुल गांधी म्हणाले की, अदाणी आमच काही करु शकत नाही. अदाणीचा पैसा काँग्रेसला संपवू शकणार नाही. ते म्हणाले, अदानी समूहाचा पैसा भारतातून बाहेर गेला आणि पुन्हा भारतात आला.

ते म्हणाले की, ''काँग्रेसमध्ये दम नाही असं म्हणता मग कर्नाटकामध्ये भाजपाला कोणी हरवलं. महाराष्ट्रात काँग्रेस फुटली का? कारण हा विचारधारेचा पक्ष आहे. आमच्यात एकच डीएनए मिळेल. (Latest Marathi News)

तत्पूर्वी इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी पुन्हा अदानींच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं. राहुल गांधी म्हणाले की, ''मी काल पत्रकार परिषद घेत सांगितलं की, एका माणसासाठी पंतप्रधान काम करत आहेत. पंतप्रधान अदानींच्या चौकशीसाठी दबाव का टाकत नाही. पंतप्रधान आणि भाजप अदानींसोबत आहेत.''

राहुल गांधी पुढे म्हणाले की, ''देशातील 60 टक्के लोकांचं प्रतिनिधित्व इथे बसलेले करता आहेत. समन्वयक समिती कमिटी स्थापन केली आहे. त्यानंतर जागा वाटपाबाबत समिती नेमली आहे. ते म्हणाले की, इंडिया आघाडी भाजपला पराभूत करेल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

निवडणुकीचं बिगुल वाजलं! माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर, प्रसिद्ध गायकाला मिळाली उमेदवारी

SCROLL FOR NEXT