Modi Cabinet 2024 Saam Tv
मुंबई/पुणे

Modi Cabinet 2024: मंत्रिपदासाठी शिंदेंच्या खासदारांना थेट दिल्लीतून फोन; अजित पवारांचे खासदार वेटिंगवर? नेमकं काय घडतंय?

NCP Ajit Pawar Group Not Have Single Ministerial Post: नव्या केंद्रिय मंत्रीमंडळाच्या शपथविधीत मंत्रिपदासाठी शिंदेंच्या खासदारांना थेट दिल्लीतून फोन आले आहेत. परंतु अजित पवार गटाला अजून कोणताही फोन आला नसल्याची माहिती समोर येत आहे.

Rohini Gudaghe

देशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडीचं सरकार स्थापन होत आहे. त्यासाठी राज्यातील महायुतीला देखील मंत्रीपद देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी आज एकनाथ शिंदे यांच्या गटातील खासदारांना दिल्लीतून फोन आल्याची माहिती मिळतेय. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला अजून एकही कॉल आलेला नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एकही मंत्रिपद नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

नव्या केंद्रिय मंत्रीमंडळाच्या शपथविधीत(Modi Cabinet 2024) मंत्रीपदासाठी अजित पवार गटाचे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. परंतु त्यांना अजून फोन आला नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी आतापर्यंत राज्यातील सहा नेत्यांना फोन (Eknath Shinde) आले आहेत. यामध्ये भाजप खासदार नितीन गडकरी, भाजपचे पियुष गोयल, शिवसेनेचे प्रतापराव जाधव, भाजपच्या रक्षा खडसे, रामदास आठवले आणि मुरलीधर मोहोळ यांना फोन आले आहेत.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी आतापर्यंत ४१ जण पोहोचले (PM Oath Ceremony) आहेत. आज ४१ नेते मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. मंत्रीमंडळाच्या विस्तारात भाजप एनडीएमधील घटकपक्षांना एकीकडे सन्मानाने संधी देत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र एकही मंत्रिपद मिळणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत. अजून प्रफुल्ल पटेलांना मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही, परंतु मागील काही दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती.

त्यामुळे आता अजित पवार गटाचे खासदार (NCP Ajit Pawar Group) वेटिंगवर आहेत का? असा सवाल आता निर्माण होत आहे.राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागांवर निवडणूक लढवली होती. परंतु केवळ एकाच जागेवर पक्षाचा विजय झाला आहे. त्यामुळेच कदाचित त्यांना मंत्रिपद नाकारलं जातंय का, अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहेत. प्रफुल पटेल, सुनील तटकरे, अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आता बैठक पार पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

SCROLL FOR NEXT