Mumbai Mockdrill Accident; मॉकड्रीलवेळी अपघात, जखमी अग्निशमन जवानाची मृत्युशी झुंज अपयशी Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Mockdrill Accident; मॉकड्रीलवेळी अपघात, जखमी अग्निशमन जवानाची मृत्युशी झुंज अपयशी

मुंबईतील माटुंगा पूर्वेकडील डॉ. भाऊ दाजी लाड मार्गावर साईसिद्धी इमारतीमध्ये मॉकड्रील दरम्यान विचित्र अपघात होऊन जखमी झालेल्या अग्निशमन जवानाची मृत्युशी झुंज अखेर अपयशी ठरली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईतील माटुंगा पूर्वेकडील डॉ. भाऊ दाजी लाड मार्गावर साईसिद्धी इमारतीमध्ये मॉकड्रील दरम्यान विचित्र अपघात (Accident) होऊन जखमी झालेल्या अग्निशमन (Firefighting) जवानाची मृत्युशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. त्यांच्यावर ६ दिवसांपासून रुग्णालयात (hospital) उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. अग्निशमन दलाकडून माटुंगा (Matunga) येथील साई सिद्धी या इमारतीत (building) मॉकड्रील सुरू असताना झालेल्या अपघातात अग्निशमन दलाचे सदाशिव धोंडिबा कर्वे, चंचल भीमराव पगारे आणि निवृत्ती सखाराम इंगवले हे तिघेजण जखमी झाले होते. (Mockdrill Accident Failed fight the death of an injured firefighter)

हे देखील पहा-

यावेळी त्यांना तातडीने नजीकच्या सायन रुग्णालयात (hospital) उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांच्यावर ६ दिवसांपासून शीव रुग्णालयात उपचार सुरू होते. कर्वे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. उपचारा दरम्यान शस्त्रक्रिया (Surgery) करावी लागली होती. मात्र, उपचार दरम्यान आज अग्निशमन दलाचे सदाशिव धोंडिबा कर्वे यांचे निधन झाले आहे. सदाशिव धोंडीबा कर्वे (वय- ५५) वडाळा येथील अग्निशमन केंद्रात यंत्रसंचालक होते.

कार्वे यांच्या पश्चात पत्नी आणि २ मुले असे कुटुंब आहे. मुंबईतील (Mumbai) अग्निशमन विभागाच्या मुख्यालयात (headquarters) शुक्रवारी सकाळी त्यांना मानवंदना देण्यात आली आहे. त्यांच्यावर सातारा (Satara) येथील मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहितीही अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Aadhar Card Link असतानाही मोबाईल नंबर बंद झाला? अपडेटसाठी लागतील फक्त ५ मिनिट, कोणत्या झंझटशिवाय होणार काम

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

SCROLL FOR NEXT