दिवा-शीळ रस्त्यासाठी मनसेचे अनोखे आंदोलन, तर माजी आ. सुभाष भोईर यांनी दिला घरचा आहेर... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

दिवा-शीळ रस्त्यासाठी मनसेचे अनोखे आंदोलन, तर माजी आ. सुभाष भोईर यांनी दिला घरचा आहेर...

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा-शीळ रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून प्रंचड मोठे खड्डे पडले आहे.

प्रदीप भणगे

दिवा : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील ठाणे महानगरपालिका हद्दीतील शिळ - दिवा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून प्रंचड मोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने चालवणे देखील कठीण होत आहे. सदर रस्ता हा ठाणे पालिकेतील प्रमुख रस्ता असून या रस्त्यावरच प्रभाग समितीचे कार्यालय देखील आहे. तरी सुद्धा या रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले नसल्यामुळे मनसे आंदोलन केले. (MNS's unique agitation for Diva-Sheel road, Ex MLA Subhash Bhoir also slams)

हे देखील पहा -

सदर रस्त्यावरील खड्डयांना गोल करत खासदार, महापौर, नगरसेवक आणि आयुक्त अशी नावे देत आंदोलन करत दिवा प्रभाग समितीला टाळे ठोकू असाच इशारा दिला. तर माजी आमदार सुभाष भोईर यांनी सांगितले की ठाणे महापालिकेची जवाबदारी असली तरी नगरसेवकांनी याकडे लक्ष देणे जरुरीचे आणि त्यांचे काम सुद्धा आहे. त्यामुळे माजी आमदार यांनी सत्ताधारी शिवसेनेला घराचा आहेर दिल्याचे बोलले जात आहे. शिळ - दिवा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. रस्ता चांगला करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा माजी आमदार सुभाष भोईर यांनी दिला होता. तर मनसे आज चक्क आंदोलनच करून टाकले. रस्त्यावरील खड्डयांना  गोल करत खासदार, महापौर, नगरसेवक आणि आयुक्त अशी नावे देत दिली.

याबाबत मनसेचे दिनेश हिरामण पाटील यांनी सांगितले की 4 वर्षे रोडचे काम केले नाही. नगरसेवक येतात नारळ फोडतात आणि निघून जातात,मात्र रस्ता काही होत नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी आता लक्ष दिले नाहीतर यापुढे त्रिव आंदोलन करू. तर मनसेचे शरद पाटील यांनी दिवा प्रभाग समितीला टाळे ठोकू असा इशाराच दिला. माजी आमदर सुभाष भोईर यांनी सांगितले की मुळात हा रस्ता दिवा शिळ अत्यंत महत्त्वाचा आहे. ठाणे महापालिकेची जबाबदारी आहेच परंतु जे लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून काम करत आहेत त्यांनी लक्ष देणे जरुरीचे आणि त्यांचे काम सुद्धा आहे, त्यांना लोकांनी निवडून दिले आहे. त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील दिवा, साबे, दातिवली, आगासन, बेतवडे, म्हातार्डी, खार्डी, फडके, शिळ या गावांना जोडणारा शिळ – दिवा हा एकमेव रस्ता आहे. सदर या भागातून मोठ्या प्रमाणवर नागरिक मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल व परिसरात नेहमी ये – जा करीत असतात. मध्य रेल्वेवरील जंक्शन म्हणून दिवा रेल्वे स्थानक असल्यामुळे या रस्त्यावर प्रंचड वाहतुकीचा ताण असतो. दिवा शहराकडे या रस्त्यावरून वाहतूक होत असल्यामुळे नागरिक अतिशय संतप्त आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

SCROLL FOR NEXT