Shivsena
Shivsena SaamTV
मुंबई/पुणे

शिवसेनेचं हिंदुत्व दसरा मेळाव्यापुरतं; मनसेची टीका

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : उर्जा मंत्री नितीन राऊतांनी सावरकरांबद्दल (Savarkar) केलेल्या आक्षेपार्ह फेसबुकपोस्ट Facebook Post वरुन राजकीय वाद सुरु झाला आहे. महाविकास आघाडीत मित्रपक्ष असणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांच्या या पोस्टमुळे काँग्रेससह शिवसेनेवरती विरोधी पक्षांनी निशाना साधला आहे. शिवसेना आणि सावरकर हे नाते सर्वांना माहिती आहे त्यामुळेच आता त्यांच्याच सरकार मधील मंत्र्यांने एवढी आक्षेपार्ह पोस्ट केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी शिवसेलेवरती चांगलीच टीका केली आहे. (MNS's criticism of Shiv Sena)

हे देखील पहा -

राऊतांच्या पोस्टमुळे आक्रमक झालेल्या मनसेने हिंदुत्वाचा धोका म्हणणाऱ्या शिवसेनेत अजून जुनं हिंदुत्व शिल्लक असेल तर या मंत्र्यार कारवाई करावी अशी मागणी देशपांडे यांनी केली असून शिवसेनेचे हिंदुत्व केवळ दसरा मेळाव्या (Dasara Melava) पुरतच मर्यादित असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी फेसबुकवर अपमानजनक पोस्ट टाकल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले असतानाच माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे Vinod Tavade यांनी दिल्लीतून राऊत यांच्यावर‌ टीका केली आहे. 'सावरकरांविषयी राजकीय बोला. पण त्यांच्याविषय व्यक्तिगत बोलण्याइतपत आपला स्तर आहे का याचा विचार राजकीय लोकांनी करावा.' असा टोला भाजप नेते विनोद तावडेंनी राऊतांना लगावला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT