Ajit Pawar Saam TV
मुंबई/पुणे

Kasba byelection 2023 : कसब्यात रविंद्र धंगेकरांचा विजय 'मनसे'मुळे सोपा झाला? अजित पवारांची प्रतिक्रिया बरंच काही सांगून गेली

मनसेच्या कार्यकर्त्यांनी कसब्यात रविंद्र धंगेकरांना मदत केल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

साम टिव्ही ब्युरो

पुणे : कसबा पोटनिवणुकीत रविंद्र धंगेकरांच्या विजयात अनेक अदृष्य हात होते, हे आता हळूहळ उघडकीय येत आहे. रविंद्र धंगेकरांना त्यांच्या जुन्या मित्रांचीही साथ लाभली. राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी कसब्यात रविंद्र धंगेकरांना मदत केल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

कसब्यातील रविंद्र धंगेकरांच्या विजयानंतर बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना थेट सांगितलं. रवींद्र धंगेकर उमेदवार आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी काम करणार आहोत. आम्हाला पक्षातून काढायचं असेल तर काढा पण यावेळी आम्ही कोणाचेही ऐकणार नाही.

मनसे कार्यकर्ते त्यांच्या वरिष्ठांसमोर स्पष्टच बोलले होते. मनसेचे हे कार्यकर्ते मला पुण्यात भेटले होते. त्यांनी मला सांगितलं होतं की, आम्हाला रविंद्र धंगेकर यांना विजयी करायचे आहे आणि आम्ही ते करणार, असं अजित पवारांनी सांगितलं.

राज ठाकरेंचे होते अत्यंत विश्वासू

रविंद्र धंगेकर हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू होते. मनसेत त्यांनी अनेक महत्वाच्या पदावर काम केले. मनसेत त्यांचे राजकीय वजन वाढले. चारवेळा वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते.पालिकेच्या माध्यमातून त्यांनी कसबा पेठ मतदारसंघात अनेक कामे केली.

रविंद्र धंगेकर यांनी मनसेकडून 2009 ची विधानसभा निवडणूक लढली होती.यावेळी त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार आणि तत्कालीन उमेदवार गिरीश बापट यांना मोठं आव्हान दिलेलं. त्यावेळी त्यांचा थोडक्यात पराभव झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple Benefits For Constipation: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक सफरचंद; बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होईल दूर

Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Saree To Ghagra : आईच्या साडीपासून बनवा गुजराती स्टाइल घागरा; नवरात्रीत तुमचा लूक दिसेल एकदम खास, वाचा ड्रेपिंगची सोपी पद्धत

WhatsApp New Feature: WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आले भन्नाट फीचर, आता 'या' ट्रिक्सने स्केड्यूल करा मेसेजेस, कसं वापरायचं?

Abhijeet Dipke : "पाकिस्तान चीन करू नका महाराष्ट्राच्या दुष्काळाकडे लक्ष द्या" अभिजित दीपिकेंचा एकनाथ शिंदे यांना टोला

SCROLL FOR NEXT