MNS Worker Saam TV
मुंबई/पुणे

Kalyan News : उल्हासनगरमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला भररस्त्यात मारहाण; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

मारहाण करणारा सुद्धा मनसेच्याच वाहतूक सेनेचा पदाधिकारी आहे.

अजय दुधाणे

कल्याण : उल्हासनगरमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. शासकीय भूखंडावरील अतिक्रमणाची तक्रार केल्याने ही मारहाण करण्यात आली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मारहाण करणारा सुद्धा मनसेच्याच वाहतूक सेनेचा पदाधिकारी आहे.

उल्हासनगरमधील मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस अमित फुंदे यांनी शासकीय भूखंडावर अनधिकृत पार्किंग सुरू केल्याची मनसे विभाग अध्यक्ष योगीराज देशमुख यांची तक्रार होती. त्यामुळे आपल्याच पक्षातल्या पदाधिकाऱ्याच्या विरोधात देशमुख यांनी महानगरपालिका, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय अशा ठिकाणी तक्रार केली होती.

त्यामुळे योगीराज देशमुख आणि अमित फुंदे यांच्यात वाद सुरू होते. याच वादातून गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अमित याच्यासह आणखी तिघांनी योगीराज देशमुख यांना म्हारळ गावाजवळील डीमार्ट परिसरात गाठलं आणि मारहाण केली.  (Latest Marathi News)

मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. मात्र या सगळ्यात योगीराज देशमुख यांच्या तक्रारींमागचा नेमका हेतू काय होता? हेदेखील तपासणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्या ७ राशींसाठी भाग्याची, बक्कळ पैसा मिळणार; तुमची रास यात आहे का?

Smartphone Explode : पावसाळ्यात स्मार्टफोनचा कधीही होऊ शकतो स्फोट, चुकूनही करू नका 'ही' १ चूक

IBD symptoms: अचानक ही 5 लक्षणं दिसली तर समजा आतड्यांना सूज आलीये!

India-China Border : मोठी बातमी! अरुणाचल सीमेवर भारत आणि चीनचे सैन्य भिडले; ६ वर्षांनंतर पुन्हा ठिणगी

Maharashtra News Live Update : नाशिक शहरातील खड्ड्यांच्या प्रश्नावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक

SCROLL FOR NEXT