Sanjay Raut : मनसे- उद्धव ठाकरे शिवसैनिक आमने-सामने, पाेलीस पाेहचले घटनास्थळी म्हणून...

ही गाेष्ट पोलिसांना कळाली. ते तातडीने विश्रामबाग चौका जवळ पाेहचले.
sangli, mns, shivsena
sangli, mns, shivsenasaam tv

Sanjay Raut In Sangli : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना मनसेकडून (MNS) काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. त्यानंतर पाेलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी मनसे आणि उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) शिवसैनिक आमने सामने आले हाेते. त्यामुळे काही काळ सांगली (Sangli) शहरात तणाव निर्माण झाला हाेता.

sangli, mns, shivsena
Karad : पुणे - बंगळूर महामार्गावर ट्रॅफिक जॅम; कोल्हापूर, सांगलीहून पुण्यासह मुंबईला जाणा-यांचे हाल

शिवसेनेचे खासदार संजय राऊत सांगली जिल्ह्यावर दौऱ्यावर आलेले आहेत. त्यांचे सांगली जिल्ह्यामध्ये शिवसैनिकांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले आहे. मिरज या ठिकाणी खासदार संजय राऊत हे दाखल झाले. यावेळी शिवसैनिकांच्यावतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. खासदार राऊत यांनी शिवसैनिकांशी संवाद केला.

sangli, mns, shivsena
Amalaki Ekadashi 2023 : सापडणार का पंढरीचा चाेर ? सजावटीची एक टन द्राक्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून गायब (पाहा व्हिडीओ)

दरम्यान खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये आज मनसे आणि ठाकरे गटाचे आमनेसामने आल्याचा प्रकार घडला. मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून खासदार संजय राऊत यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार होते.

ही गाेष्ट पोलिसांना कळाली. ते तातडीने विश्रामबाग चौका जवळ पाेहचले. त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी ठाकरे गटाचे शिवसैनिक देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे. (Maharashtra News)

त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं. खबरादारी म्हणून पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com