MNS/Shivsena Saam TV
मुंबई/पुणे

मनसेला डोंबिवलीत धक्का; तालुका प्रमुखासह २ माजी नगरसेवक सेनेच्या वाटेवर?

यापूर्वी भाजपच्या काही माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे भाजप (BJP) नंतर सेना मनसेला खिंडार पाडण्याच्या तयारीतआहे की काय अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत

प्रदीप भणगे

डोंबिवली : कोरोना आणि त्यानंतर ओबीसी आरक्षणामुळे (OBC Reservation) महापालिका क्षेत्रातील निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला रखडलेल्या या सर्व निवडणुकांबाबत निर्णय घ्यायला सांगितला असल्याने त्या लवकरच पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय क्षेत्रातील घडामोडींना वेग आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवली महापालिका (Kalyan Dombivali Municipal Corporation) क्षेत्रातील मनसेचे माजी नगरसेवक प्रभाकर जाधव (प्रभाग क्रमांक १२२ निळजे घेसर) आणि पूजा गजानन पाटील (प्रभाग क्रमांक १२१, कटाई -घरीवली) हे दोन नगरसेवक शिवसेनेत प्रवेश दाट शकत्या आहे. तसेच यावेळी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मनसे (MNS) कल्याण तालुका प्रमुख गजाजन पाटील हे देखील शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करणार आहेत. यापूर्वी भाजपचे काही माजी नगरसेवक यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

हे देखील पाहा -

त्यामुळे आता भाजप (BJP) नंतर आता मनसेला खिंडार पाडण्याच्या तयारीत शिवसेना आहे की काय अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. दरम्यान, एकीकडे मनसे मशिदींवरील भोंग्यांच्या भूमिकेवरुन अॅक्टीव मोडवर असताना हे दोन माजी नगरसेवक ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत गेले तर मग मात्र मनसेसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT