MNS protest against VLCC Kalyan over student training delay saam tv
मुंबई/पुणे

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

Students Allege Delayed Training At VLCC: कल्याणमधील व्हीएलसीसी संस्थेत प्रशिक्षणास विलंब होत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर मनसेने ठिय्या आंदोलन केले. पूर्ण फी भरूनही योग्य प्रशिक्षण न मिळाल्याने विद्यार्थ्यांची फी परत करण्याची मागणी करण्यात आली.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात ब्युटी पार्लर आणि सलून प्रशिक्षण देणाऱ्या व्हीएलसीसी संस्थेविरोधात विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत ठिय्या आंदोलन केले. प्रशिक्षणासाठी पूर्ण फी भरूनही वेळेत आणि योग्य पद्धतीने प्रशिक्षण दिले जात नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, दोन महिन्यांचा कोर्स पूर्ण करण्यासाठी तब्बल आठ ते नऊ महिने लागत आहेत. तसेच ११ दिवसांचा प्रशिक्षण कोर्स सुरू करून तीन महिने उलटूनही विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रशिक्षण देण्यात आलेले नाही

संस्थेत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पुरेसे शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक नुकसानासोबतच मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली. या प्रकाराची तक्रार प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे केली. त्यानंतर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्हीएलसीसीच्या कार्यालयात धडक देत ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी आकारण्यात आली असल्याने प्रशिक्षण देणे शक्य नसल्यास विद्यार्थ्यांची फी परत करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनाची दखल घेत व्हीएलसीसीच्या समन्वयक पालकर मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत लेखी आश्वासन दिले. त्यानंतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र, विद्यार्थ्यांना दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कितपत पूर्ण होते, याकडे आता विद्यार्थ्यांसह मनसे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

चॉकलेटचं आमिष दाखवत 3 वर्षांच्या चिमुकलीला सोबत नेलं, २० मिनिटांनी घरी आणून सोडलं... नराधमाचं संतापजनक कृत्य

जेवताना तोंडी लावण्यासाठी बनवा वांग्याचे कुरकुरीत काप; सोपी आणि चवदार रेसिपी!

SCROLL FOR NEXT