Raj Thackeray  SaamTv
मुंबई/पुणे

पुण्यात भिडे पुलाजवळ नदीपात्रात होणार राज ठाकरेंची सभा

गोपाल मोटघरे

पुणे : मुंबई, ठाणे आणि औरंगाबादनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे पु्ण्यातही (Pune) सभा घेणार आहे. अयोध्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची ही सभा होणार आहे. राज यांच्या सभेसाठी त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS Pune) पुणे पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. येत्या २१ मे ते २८ मे रोजी पुण्यातील भिडे पुलाशेजारी नदी पात्राच्या रस्त्यालगत राज ठाकरे यांची सभा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मनसैनिकांनी तयारी सुरू केली असून पोलिसांकडून जागेची पाहणी देखील करण्यात आली आहे. (MNS Raj Thackeray Will Take Sabha In Pune By 21th May)

दरम्यान, या सभेसाठी परवानगी देण्यात यावी अशा आशयाचा एक पत्र पुण्यातील मनसे पक्षाकडून डेक्कन पोलिसांना (Pune Police) देण्यात आलं आहे. डेक्कन येथील मुठा नदी पात्रात राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यात यावी अशी मागणी मनसेने केली आहे. मात्र तूर्तास तरी डेक्कन पोलिसांच्या वतीने राज ठाकरे यांच्या सभेला कोणतीही परवानगी देण्यात आली नाही. ज्या ठिकाणी मनसे पदाधिकाऱ्यांनी सभाग घेण्याची मागणी केली आहे. त्या ठिकाणची एनओसी संबधित खात्याने दिल्या नंतरच मनसेला आम्ही सभेसाठी परवानगी देऊ अस डेक्कन पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

दुसरकडे राज ठाकरे हे आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहे आजपासून राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.पुण्यातील मनसे अंतर्गत वाद तसेच पुण्यात मनसेची सभा या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जातो आहे. महत्वाचा पुणे दौरा असणार आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेसाठी जागा फायनल झाली आहे. डेक्कन नदी पत्रात आता सभा होणार आहे.

दरम्यान, राज यांच्या सभेसाठी आधी सभेसाठी तीन जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. मात्र, जागेत बदल करण्यात आला आहे. आता डेक्कनला नदीपात्रात ही सभा होणार आहे. राज ठाकरेंच्या सभेसाठी मनसेने डेक्कन पोलिसांना पत्र दिले आहे. मात्र, ज्या ठिकाणी मनसे पदाधिकाऱ्यांनी सभाग घेण्याची मागणी केली आहे. त्या ठिकाणची एनओसी संबधित खात्याने दिल्या नंतरच मनसेला आम्ही सभेसाठी परवानगी देऊ अस डेक्कन पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

SCROLL FOR NEXT