mns pune city president vasant more express his feelings in the tweet Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: 'राज'आदेश न मानणारा मनसैनिक म्हणाला "किल्ल्याचे बुरुज ढासाळायला लागले..."

Vasant More Latest News: वसंत मोरे पक्षाला रामराम ठोकणाऱ्या पुण्यातील नाराज पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. याबाबत त्यांनी एक सूचक ट्विट केलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी घेतलेली सभा चांगलीच गाजली. या सभेत त्यांनी मशीदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे राजकारण तापलं होतं. राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे मनसेचे (MNS) अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले होते. पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी राज ठाकरेंच्या 'मशीदीसमोर स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याच्या' आदेशावर आक्षेप घेत त्याची अंमलबजावणी करणार नसल्याचं म्हटलं होतं. आता तेच वसंत मोरे पक्षाला रामराम ठोकणाऱ्या पुण्यातील नाराज पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. याबाबत त्यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. (mns pune city president vasant more express his feelings in the tweet)

हे देखील पहा -

नेमकं काय म्हणाले वसंत मोरे -

पुण्यातील मनसेचे शिलेदार वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकणाऱ्या पुण्यातील (Pune) पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. याबाबत त्यांनी सूचक ट्विट (Tweet) केलंय. यात वसंत मोरे म्हणाले की, "एखाद्या किल्ल्याचे बुरुज ढासाळायला लागले ना की किल्ला पडायलाही वेळ लागत नाही. जेव्हा एखादा नेता पक्षाचा राजीनामा देतो ना तेव्हा नक्की त्याचा काहीतरी स्वार्थ असतो पण जेव्हा एखादा शाखाअध्यक्ष, एखादा कार्यकर्ता राजीनामा देतो ना तेव्हा त्याला जरूर समजावून संगायला पाहिजे. तेव्हा आज शाखा अध्यक्ष माजिद शेख व वाहतूक उपशहराध्यक्ष शहाबाज पंजाबी यांच्या घरी गटनेते साईनाथ बाबर जनाधिकार शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी, उपशहराध्यक्ष आशिष देवधर, विभागाध्यक्ष गणेश भोकरे, महिला विभागाध्यक्ष सौ.नीता पालवे, उपशहराध्यक्ष अझहर सय्यद, एसटी कामगार शहर अध्यक्ष ललित तींडे, महिला उपविभागाध्यक्ष नाझ इनामदार, शाखाध्यक्ष सलीम सय्यद, मोहसीन शिकालकार, विजय रजपूत, संग्राम तळेकर यांचेसह भेटून आलो. पोरांच्या चेहऱ्यावर काय हसू आलं राव! जय मनसे!" वसंत मोरे यांच्या या ट्विटवरुन पुण्यातील मनसे समर्थकांमध्ये चर्चांना उधाण आलंय. यातून ते राज ठाकरेंना विनंतीवजा सूचना करत आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय.

मशिदीवरील भोंग्याबाबत राज ठाकरे आक्रमक -

मशिदीवरचे भोंगे खाली उतरवावे लागतील, मी धर्मांध नसून धर्माभिमानी असल्याचे म्हणत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मशिदीवरील भोंग्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला. जर सरकारने मशिदीवरील भोंगे उतरवण्याचे काम केले नाही तर आम्ही त्या मशिदींसमोर मोठमोठे स्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असे राज ठाकरे म्हणाले.

हनुमान चालीसा लावण्यास वसंत मोरेंचा स्पष्ट नकार -

राज ठाकरेंच्या भोंग्याबाबतच्या भूमिकेवर वसंत मोरे म्हणाले की, राज ठाकरेंची भूमिका चुकीची नाही. मला भूमिकेबाबतीत नाही तर कार्यकर्त्यांनी थोडं शांततेनं घेतलं पाहिजे असं वाटतं. आमचे काही कार्यकर्ते उत्साही असतात त्यामुळे त्यांनी लावली हनुमान चालीसा लावली. "पण मी माझ्या प्रभागात असे काही करणारं नाही. सध्या रमजान सुरु आहे, मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे. म्हणून मी हनुमान चालीसा वगैरे काही लावणार नाही" असे देखील वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे.

मनसे पदाधिकाऱ्यांचे राजीनामे -

दरम्यान राज ठाकरेंच्या भाषणानंतर मनसेला पुण्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. कोंढव्यातील मनसे वाहतूक सेनेचे उपशहराध्यक्ष शेहेबाज पंजाबी यांनी मनसे जिल्हा अध्यक्ष रवींद्र गारुडकर यांच्याकडे दिला राजीनामा दिला. राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे नाराज होऊन त्यांना हे पाऊल उचललं आहे. या दोघांचीही मनधरणी करणार असल्याचं वसंत मोरेंनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार वसंत मोरेंनी पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT