Siddhi Hande
ओली भेळ हा पदार्थ लहानापांसून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. चौपाटीवर मिळणारी ओली भेळ आता तुम्ही घरी बनवू शकतात.
ओली भेळ बनवण्यासाठी सर्वात आधी गोड चिंचेच पाणी बनवा. त्यासाठी आधी चिंच पाण्यात भिजत घ्या.
यानंतर चिंच मऊ झाल्यावर त्याचा कोळ काढून घ्या. त्यात गूळ साखर आणि मीठ टाका.
यात थोडे पाणी टाका. त्यानंतर फ्रिजमध्ये ठेवा.
Oli Bhel Recipe
ओली भेळ बनवण्यासाठी सर्वात आधी मिरची आणि लसूण ठेचून घ्या.
यानंतर एका भांड्यात मुरमुरे घ्या.त्यात ही हिरवी मिरचीची पेस्ट टाका.
यानंतर त्यात तुमच्या आवडीनुसार फरसाण किंवा शेव टाका.
यानंतर त्यात कांदा-टॉमेटो आणि कोथिंबीर टाकून मिक्स करुन घ्या.
यानंतर त्यात चिंचेच पाणी टाका आणि मिक्स करा.
या ओली भेळवर तुम्ही वरुन बारीक शेव टाका आणि कोथिंबीर टाका.