Raju Patil And Ravindra Chavan  Saam Tv
मुंबई/पुणे

MNS Tweet On Ravindra Chavan: 'झोपेचं सोंग घेऊन जबाबदारी झटकणाऱ्यांना...', मुंबई-गोवा महामार्गावरुन मनसेचे रविंद्र चव्हाणांना प्रत्युत्तर

MNS On Mumbai -Goa Highway Issue: मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलं आहे.

Priya More

अभिजीत देशमुख, कल्याण

MNS News: मुंबई- गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरुन मनसे (MNS) आक्रमक झाली आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Minister Ravindra Chavhan) यांच्या पत्राला मनसेचे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी ट्वीट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'तुम्ही स्वबुद्धीने राज्याचे हित जपले असते तर आमच्यावर दगड भिरकावण्याची वेळच आली नसती. कोकण महामार्गावर अपघातात गेलेले बळी पाहता कोकणातील दगडालाही पाझर फुटेल. पण गेली अनेक वर्षे सत्तेत भागीदार असताना किंवा सत्ताधीश असताना तुमचा हा कोकणी स्वाभीमान का जागा झाला नाही.'

'झोपेचं सोंग घेऊन जबाबदारी झटकणाऱ्यांना महाराष्ट्रात दगड मारून उठवायची आमची पद्धत आहे. दगड भिर्कावणाऱ्या जनतेचा जेंव्हा कोप होतो तेंव्हा ती खडी फोडायच्याही लायकीची ठेवत नाही, असे प्रत्यूत्तर मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलं आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या १७ वर्षांपासून सुरु आहे. आतापर्यंत हजारो कोटी रुपये खर्च झाले आहे. परंतू या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. या रस्त्याची पाहणी खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. त्यानंतर याच रस्त्यावरुन त्यांनी सत्ताधारी पक्षाला टिकेचे लक्ष केले. राज ठाकरे यांच्या टिकेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावर तीव्र आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान टोल नाक्याची तोडफोड करण्यात आली.

या आंदोलनानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी एका पत्राद्वारे मनसेला उपरोधिक चिमटा काढला होता. त्यांच्या पत्राला आता मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिउत्तर दिले. या पत्राद्वारे त्यांनी बांधकाम मंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. 'येत्या गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेनचे काम व ह्या वर्षा अखेरीस संपूर्ण मार्गिका पूर्ण होईल ह्या आश्वासनाने थोडा दिलासा नक्कीच मिळाला. पण हा दिलासा नसून वचन असेल आणि तुम्ही ह्या वचनपुर्तीसाठी सज्ज असालच हीच आशा आहे!', असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

'कोकण महामार्गावर गेली कित्येक वर्षे होत असलेले अपघात आणि त्यात गेलेले बळी पाहता कोकणातल्या ‘दगडालाही’ पाझर फुटेल, पण गेली अनेक वर्ष सत्तेत भागीदार असताना किंवा सत्ताधीश असताना तुमचा हा कोकणी स्वाभिमान का जागा झाला नाही?', असा सवाल राजू पाटील यांनी केला आहे.

'जर तुम्ही स्वबुद्धीने राज्याचे हित जपलेत तर आमच्यावर दगड भिरकावण्याची ही वेळच आली नसती. आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी स्वतः तुमचा आदर्श ठेवला असता, पण काय करणार तुमच्या लेखी मात्र प्रत्येक कार्यकर्ता हा नासमज असतो, हे तुमचेच विधान नाही का? जनतेने भिरकावलेल्या दगडामागे कोणाची इच्छा नाही, तर त्यांचा उद्वेग असतो!', असं ते म्हणाले.

'सन्माननीय राजसाहेबांनी केलेले विधान अगदी तंतोतंत खरे ठरते, “जर टोलनाके तोडफोडीची भरपाई माझ्याकडून घ्यायची असेल तर रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची जबाबदारी केंद्र/राज्यामध्ये बसलेले सत्ताधारी घेणार का?', असा सवाल त्यांनी केला आहे.

त्यांनी पुढे सांगितेल की, 'तुम्ही म्हणता तुमची निष्ठा सर्वप्रथम देशाशी आहे, म्हणूनच का द्वारकेला जायचा एक्स्प्रेस वे सात वर्षांत बनतो आणि गेली सतरा वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम आजतागायत पूर्ण होत नाही. झोपलेल्या तोंडावर पाणी मारून उठवायची पद्धत आहे आणि झोपेचं सोंग घेऊन जबाबदारी झटकणार्यांना महाराष्ट्रात दगड मारून उठवायची आमची पद्धत आहे.

तसंच, 'पनवेल ते झारप ह्या मार्गाच्या कामावर स्वतः आठवेळा उतरून तुम्ही पाहणी केलीत, अहो जे तुमचं कर्तव्य आहे त्याचंच कसलं आलंय मोठेपण? आणि जर तुम्ही पहिल्या पाहाणीत योग्य ते निर्देश दिले असते तर कदाचित तुमच्यावर आठ वेळा चकरा मारायची वेळच आली नसती. जनतेला आत्ता केलेले वायदे तरी पाळावेत हीच आशा बाळगत आहोत. कारण दगड भिर्कावणाऱ्या जनतेचा जेंव्हा कोप होतो तेंव्हा ती खडी फोडायच्याही लायकीची ठेवत नाही, इतकं लक्षात असू द्या म्हणजे झालं.' असं राजू पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT