MNS MLA Raju Patil Advice to Manoj Jarange Maratha Reservation Latest Updates Saam TV
मुंबई/पुणे

MNS Raju Patil: तुमच्या आंदोलनाला आमचाही पाठिंबा, पण... मुंबईत येण्यापूर्वी मनसेचा मनोज जरांगेंना सल्ला

MNS Raju Patil: मुंबईत दाखल होण्याआधी मनसे आमदार राजू पाटील यांनी मनोज जरांगे यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

Satish Daud

Maratha Reservation News

राज्य सरकारला दिलेली डेडलाईन संपल्यानंतर आता मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मुंबईकडे कूच करणार आहेत. आझाद मैदानावर मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून २० जानेवारीला मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघतील. दरम्यान, मुंबईत दाखल होण्याआधी मनसेने जरांगे यांना मोलाचा सल्ला दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे यांचं मुंबईत स्वागतच आहे. मात्र, आरक्षणासाठी आंदोलन करताना वातावरण खराब होऊ नये, आपण या राज्याचे सुपुत्र आहोत, याचं भान ठेवूनच सर्वांनी आंदोलन करावं, असा सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांनी मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलकांना दिला आहे. (Latest Marathi News)

मराठा आरक्षणाचा विषय इतका सोपा नाही. पहिले सरकार बरं-बरं बोलत होतं. आता खरं खरं बोलत आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला इम्पेरिकल डाटा जमा करणे आवश्यक आहे. त्यासाठी मागासवर्गीय आयोगाकडून संख्या घ्यावी लागेल, असं राजू पाटील म्हणाले.

राज्य सरकारने जेव्हा जरांगे पाटील यांची भेट घेतली, सर्व गोष्टी क्लियर करायला हव्या होत्या. अजूनही सरकारने स्पष्ट बोलायला सुरुवात केली पाहिजे. तेव्हा जरांगे यांना समजून सांगितलं असतं तर ही वेळ आली नसती. सरकारने ज्या मुठी झाकून ठेवल्या आहेत, त्यामुळे ही वेळ आली आहे, असं म्हणत राजू पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा अजिबात विरोध नाही. मुंबईत त्यांचं स्वागतच आहे. मात्र आरक्षणासाठी आंदोलन करताना वातावरण खराब होऊ नये, आपण या राज्याचे सुपुत्र आहोत याच भान ठेवूनच सर्वांनी आंदोलन करावं, असा सल्ला देखील राजू पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

SCROLL FOR NEXT