MNS on Pathan Movie Saam tv
मुंबई/पुणे

MNS on Pathaan Movie : 'पठान'चा बॉक्स ऑफिसवर डंका; पण मराठी सिनेमांची गोची, मनसेचा चित्रपटगृहांना 'खळखट्याक'चा इशारा

'पठान'च्या यशामुळे मराठी सिनेसृष्टीच्या यशस्वी वाटचालीला फटका बसत आहे. यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

श्रेयस सावंत

MNS on Pathaan Movie: तब्बल ४ वर्षांनी बॅालिवूडचा किंग खान 70 mm च्या पद्यावर परतला आहे. शाहरूखचा 'पठान' शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एकीकडे या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमधून जोरदार कल्ला केला आहे. तर रीलीज होण्याच्या पहिल्याचं दिवशी सिनेमाने जोरदार गल्ला जमवला आहे. मात्र 'पठान'च्या यशामुळे मराठी सिनेसृष्टीच्या यशस्वी वाटचालीला फटका बसत आहे. यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. (Latest Marathi News)

'पठान' (Pathaan) सिनेमामुळे पुन्हा एकदा मराठी सिनेमाला (Marathi Movie) मल्टीप्लेक्समध्ये स्क्रीन स्पेस मिळत नाही आहे. सगळ्या चित्रपटगृहांनी किंग खानच्या 'पठान'ला सगळे शोचं देऊन टाकले आहे .

आज पिकोलो, व्हिकटोरीया आणि बांबू हे तिन्ही मराठी सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. पण या कोणालाही सिनेमागृहात योग्य शोचं टाइमिंग मिळालं नाही. यावरून मनसे आता अक्रमक झाली आहे.

मनसे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहे. शाहरुखचा कमबॅक आहे म्हणून मल्टीप्लेक्सनी ‘बांबू’ आणि ‘पिकोलो’ या चित्रपटांचा बळी का द्यावा? ‘पठान’चं भलं करा, पण मराठी चित्रपटांनाही त्यांचा वाटा द्यायलाच पाहिजे, असं या मल्टीप्लेक्स चालकांना का वाटत नाही? असे प्रश्न मनसे नेते अमेय खोपकर यांनी उपस्थित केले आहेत.

प्रत्येकवेळा मुंबईमध्ये मराठी सिनेमालाचं काढता पाय का घ्यावा लागतो, अशी परिस्थिती मुंबईत निर्माण झाली आहे. शाहरूख , सलमान , आमीर , अजय किंवा अक्षय यांचे सिनेमे आले तर नेहमी का मराठी सिनेमाला दुजा भाव का दिला जातो. त्यामुळे मनसेला मराठी सिनेमासाठी त्यांच्या स्टाईल आंदोलन करावं लागतं, असे प्रश्न मनसेकडून उपस्थित करण्यात येत आहे.

या वादामुळे मुंबईत शाहरुखचा 'पठान' सिनेमा चांगला गल्ला कमावेल की नाही? 'पठान' सिनेमाच्या एन्ट्रीनंतर मराठी सिनेमाचं काय होणार हे पाहावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Atal Pension Yojana: या सरकारी योजनेत दर महिन्याला मिळते ₹५०००; गुंतवणूकीचं संपूर्ण कॅल्क्युलेशन वाचा

Vaidehi Parshurami Photos: लाल साडीत खुललंं वैदेही परशुरामीचं सौंदर्य, फोटो पाहा

Vande Bharat Train : मोठी बातमी! देशात आणखी ४ वंदे भारत ट्रेन सेवेत, जाणून घ्या तुमच्या शहरातून धावणार का?

SCROLL FOR NEXT