Vasant More- Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

'रस्ता बदला, आपण चुकीच्या दिशेने आहोत'; वसंत मोरेंचा WhatsApp स्टेटस व्हायरल

मनसे आणि मोरे यांच्यातील नाराजी नाट्याचे प्रकरण शांत झालं, असं वाटत असतानाच मोरे यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे आणखी चर्चांना उधाण आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्राची कुलकर्णी -

पुणे : राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) सभेनंतर पुणे मनसेचे नेते वसंत मोरे हे खूप चर्चेत आले होते. राज (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरती त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या नाराजीमुळे मनसेने त्यांचे पुणे शहर अध्यक्षपदाचा पदभार काढून घेतला होता. त्यामुळे मनसे आणि वसंत मोरे (Vasant More) यांच्यात सारं काही अलबेल आहे असं दिसत नसल्याच्या चर्चा सुरु होत्या.

मात्र, त्यानंतर ठाण्यात झालेल्या सभेला मोरे उपस्थित राहिले त्यांनी आपण मनसे सोडणार नसल्याचंही स्पष्ट केलं. तसंच मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या बंगल्यावरती जाऊन त्यांची भेट घेऊन आल्यामुळे हे नाराजी नाट्याचे प्रकरण शांत झालं असं वाटत असतानाच मोरे यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे आणखी चर्चांना उधाण आलं आहे.

मोरे यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला (WhatsApp) लिहलं आहे. "ज्यांच्या जीवनात संघर्ष नाही, निंदा नाही, विरोध नाही, त्यांनी रस्ता बदला आपण चुकीच्या दिशेने आहोत आणि आजकाल याचे अनुभव येत आहेत." मोरे यांच्या या स्टेटसमुळे पुन्हा चर्चा सुरू झाल्या आहेत. तसंच सध्या राज्यासह देशभारात भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसे (MNS) नेते आणि कार्यकर्ते चर्चेत असतानाच वसंत मोरे मात्र देवदर्शनासाठी तिरुपतीला गेले होते.

म्हणून गेलो तिरुपतीला मोरेंच स्पष्टीकरण -

ते मागील २ दिवसांपासून तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी बाहेर असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच हा आपला पूर्व नियोजित कार्यक्रम होता त्यामुळे तिरुपती बालाजीला मी आलो आहे. मात्र, मी सध्या पुणे शहराचे नव्हे, माझ्या प्रभागाचे नेतृत्व करत असून राज साहेबांच्या आदेशानुसार माझ्या भागातील मशिद प्रमुखांसोबत मी बोललो असून त्या सर्वांनी माझी विनंती मान्य केली असून आजची नमाज भोंग्याविना केली आहे. तसंच भविष्यात ही ते मला सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. म्हणून माझ्या प्रभागातील सर्व मुस्लीम बांधवांचे हार्दिक आभार...! अशी फेसबुक पोस्ट लिहीत मोरे यांनी त्यांच्या तिरुपती दर्शनाला गेल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thamma OTT Release : रश्मिकाचा 'थामा' चित्रपट ओटीटीवर कुठे अन् कधी पाहता येणार? वाचा अपडेट

Prevent Heart Attack: रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज होतील दूर, टळेल हार्ट अटॅकचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Maharashtra Live News Update: नाशिकच्या पंचवटी परिसरात टवाळखोरांचा धुडगूस, वाहनांची तोडफोड

Congress: मोठी बातमी! मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार, मविआतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Maharashtra Board Exam : दहावी- बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ! शाळा अन् महाविद्यालयांना ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत, पालकांची नाराजी

SCROLL FOR NEXT