CM साहेब आता लोकांच्या पाठीवर शिवपंख लावा - संदीप देशपांडे यांची खोचक टीका Saam Tv News
मुंबई/पुणे

CM साहेब आता लोकांच्या पाठीवर शिवपंख लावा - संदीप देशपांडे यांची खोचक टीका

राज्य सरकारने कोरोना निर्बंधात शिथीलता दिली असली तरी सर्वसामान्य मुंबईकरांना अद्यापही लोकलने प्रवास करण्याची मुभा नाही. याबाबत संदीप देशपांडे यांनी खोचक टीका केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM of Maharashtra Uddhav Thackeray) यांनी अनलॉकचा (unlock) भाग म्हणून अनेक आस्थापनांना परवानगी दिली आहे. परंतु सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल ट्रेनने (mumbai local train) प्रवासाची मुभा दिली नाही. याच मुद्दयावरुन मनसे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande MNS) यांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केली आहे. ''सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण "शिव पंख लावून दिलेत तर त्यांना कामावर ही जाता येईल'' अशी टीका त्यांनी केली आहे. (MNS leader sandeep deshpande criticize to CM about local train)

हे देखील पहा -

आपल्या ट्विटमध्ये संदीप देशपांडे म्हणाले की,''सी.एम साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार.लोकल बंद आहेत बस ला प्रचंड वेळ लागतो गर्दी ही असते.आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण "शिव पंख लावून दिलेत तर त्यांना कामावर ही जाता येईल आणि त्रास पण नाही.मला खात्री आहे आपण हे करू शकता आमचा सीएम जगात भारी'' अशी खोचक टीका संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यावर केली आहे.

राज्यात कोरोना पॉझिटीव्हीटी रेट कमी असणाऱ्या ठिकाणी सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालये पूर्ण क्षमतेने काम करु शकतील. मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर कुणालाही लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा नाही. त्यामुळे या चाकरमान्यांना बसनेच कामावर जावे लागत आहे. मात्र लाखोंच्या संख्येने असलेल्या या मुंबईतील चाकरमान्यांसाठी बससेवा अपुरी पडत असून बससेवेवर मोठा ताण पडत आहे. बस वेळेवर येत नाही, लोकलच्या मानाने बसने प्रवास करणे जास्त खर्चिक आणि थकवणारे आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठीही लोकल ट्रेन सुरु करावी अशी मागणी वेळोवेळी होत असते. परंतु कोरोनाच्या प्रसाराचे कारण देत राज्य सरकारने केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवासाची मुभा दिली आहे.

यावरुन विरोधकांनीही अनेकदा सरकारवर निशाणा साधत कोरोना लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना तरी लोकल प्रवासाला परवानगी देण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयानेही सरकारला याबाबत विचारणा केली. लसीचे दोन डोस घेऊनही लोकल प्रवासाला परवानगी नाही, मग लस घेण्याचा फायदा काय अशा शब्दांत कोर्टाने सरकारला फटकारले आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT