raju patil saam tv
मुंबई/पुणे

Raju Patil : ठाणे ते कल्याणचा प्रवास हेलिकॉप्टरने, रस्त्याने पलावा पूलाची परिस्थिती बघितली असती; राजू पाटलांचा शिंदेंना टोला

raju patil on eknath shinde : डोंबिवलीतील पलावा पुलाच्या परिस्थितीवरून राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. राजू पाटील यांनी निशिकांत दुबे यांच्यावरही टीका केली.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

डोंबिवलीतील पलावा पुलाचं उद्घाटन झाल्यानंतर तीन दिवसांत रस्त्याची परिस्थिती दयनीय झाली आहे. वाहतूक कोंडी कमी करणाऱ्या पुलाची काही दिवसांत दयनीय अवस्था झाल्याने मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी महायुती आणि एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी हेलिकॉप्टर ऐवजी रस्त्याने आले असते तर पलावा पुलाची परिस्थिती बघता आली असती, अशा शब्दात माजी आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणमध्ये आले होते. यावेळी ते ठाण्याहून हेलिकॉप्टरने कल्याणमध्ये दाखल झाले. त्यानंतर कारने बिर्ला कॉलेज आणि त्यानंतर बिर्ला मंदिरात गेले. उपमुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून मनसेचे नेते राजू पाटील यांनी टोला लगावला.

'आषाढी एकादशीनिमित्त पालकमंत्री कल्याणमध्ये विठ्ठल मंदिरात जाणार होते. ते ठाण्यावरून हेलिकॉप्टरने पलावाला येणार होते. तिकडून ते शहाडला विठ्ठल मंदिरात जाणार होते. मात्र वीस किलोमीटरसाठी हेलिकॉप्टर कशाला पाहिजे, अशी टीका राजू पाटील यांनी केली.

'ते हेलिकॉप्टरने भिवंडीला गेले. तेथून कल्याणला आले. पालकमंत्री या पुलावरून आले असते तर त्यांना परिस्थिती कळाली असती. कधीतरी जमिनीवर या, फक्त आपल्या लाडक्या बबड्याचे काम बघायला येऊ नका. लोकांच्या देखील समस्या बघा, असा टोला राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

दरम्यान, राजू पाटील यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यावरही सडकून टीका केली. 'काहीजण भुंकत असतात. आम्ही त्याकडे लक्ष देत नाही. ते राज्याचे प्रतिनिधित्व करतात. त्यापेक्षा जास्त दहा पट जीएसटी एकटा महाराष्ट्र राज्य जमा करतो. ते आम्हाला शिकवणार? तुमच्याकडे गुन्हेगारी होते. ,ज्या खंडण्या व्यापाऱ्यांना अपहरण करून वसूल केल्या जातात. त्यासाठी तुमच्या जातीचे व्यापारी, तिथे राहत नाहीत. याचा कुठंतरी आता परीक्षण करा, अशा शब्दात त्यांनी केली.

'आता कुठे उत्तर प्रदेशची परिस्थिती सुधारत आहे. तिथे पोषक भूमी नाही म्हणून ते महाराष्ट्रात आलेत. स्वतःचे आत्मपरीक्षण आत्मचिंतन करून चिंतन करा, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिलापटावर अशोक स्तंभ कोरल्यामुळे मोठा वाद; श्रीनगरमध्ये वातावरण तापलं

Special Train: दसरा- दिवाळीसाठी मध्य रेल्वेची खास सुविधा; धावणार विशेष रेल्वे Reservation करता येणार?

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा अजित पवार यांना 'दे धक्का'; राष्ट्रवादीचा बडा नेता लागला गळाला

Kalyan : कल्याणमधील नामांकित हॉटेलचा हलगर्जीपणाचा कळस; जेवणात आढळलं झुरळ, ग्राहकाचा संताप

गर्ल्स हॉस्टेलवर पोलिसांची धाड; सेक्स रॅकेटचा पदार्फाश, १० महिलांना अटक

SCROLL FOR NEXT