raju patil  Saam tv
मुंबई/पुणे

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

raju patil news : डोंबिवलीत शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं आहे. मनसे नेते राजू पाटील यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

Vishal Gangurde

डोंबिवलीत शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकीय वातावरण तापलं

मनसे नेते राजू पाटील यांची भाजप नेत्यावर रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका

राजू पाटील यांच्या टीकेने चर्चांना उधाण

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवलीत आन ठाकूर, मान ठाकूर शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मनसे नेते राजू पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना नाव न घेता टोला लगावला आहे.

डोंबिवलीत शनिवारी रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आन ठाकूर मान ठाकूर शौर्यगाथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसे नेते राजू पाटील यांनाही निमंत्रण देण्यात आले होते, मात्र त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहणे टाळले. त्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते.

गोग्रासवाडी परिसरात रविवारी संध्याकाळी मनसेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन राजू पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मोठ्या संख्येने मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना राजू पाटील यांनी डोंबिवलीतील आमदारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.

आता इथल्या आमदारांना आगरी समाजाची आठवण येते ही आनंदाची गोष्ट आहे. खरं तर ही त्यांची चौथी टर्म आहे. तिसऱ्या टर्ममध्ये त्यांनी स्मारक बांधले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. मात्र अशाच प्रकारे सर्व समाजांची दखल घेऊन काम केले तर ते अधिक चांगले राहील,असे राजू पाटील म्हणाले.

तसेच त्यांनी कार्यक्रमाला गैरहजर राहण्यामागचे कारणही स्पष्ट केले. मी देखील शौर्यगाथा कार्यक्रमाला जाणार होतो. मात्र कार्यक्रमस्थळी सर्वत्र कमळाचे चिन्ह लावलेले दिसत होते. त्यामुळे तो एका पक्षाचा कार्यक्रम असल्याचे जाणवले आणि मी जाणे टाळले,असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, गोग्रासवाडी परिसरातील मनसे पदाधिकारी मनोज घरत यांनी मागील महापालिका निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याच परिसरात आता मनसे कार्यालयाचे उद्घाटन झाल्याने या घडामोडींनाही राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी बोलताना राजू पाटील यांनी लवकरच डोंबिवली शहराध्यक्षाची घोषणा होणार असल्याचेही संकेत दिले. मात्र त्यांनी ज्या पद्धतीने रविंद्र चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. त्यामुळे डोंबिवलीतील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनाचा मोठा साठा जप्त

Friday Horoscope: या राशींनी कोणताही निर्णय घेताना घाई करू नका; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

Friday Horoscope : कामाचा ताण वाढेल; 5 राशींच्या व्यक्तींना अचानक होणार धनलाभ, वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

मिसिंग लिंकवर बोलणं महाराष्ट्राचा अपमान कसा?विरोधात असताना तुम्ही काय केलं? राज ठाकरेंचे फडणवीसांवर हल्लाबोल

Fact Check: राममंदिर चोरीतील कोट्यवधींच्या नोटा सापडल्या? गाडीतील गुप्त कप्यात लपवली कोट्यवधींची रोकड?

SCROLL FOR NEXT