MNS Morcha Avinash Jadhav detained : मीरा भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज पहाटे मनसेचे ठाणे-पालघरचे विभागप्रमुख अविनाश जाधव यांना राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मनसेकडून मीरा भाईंदरमध्ये आज सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार होता. अमाराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्च्याला उत्तर म्हणून मनसेकडून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी अविनाश जाधव आणि मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्याही अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Mumbai Police take MNS leader Avinash Jadhav into custody)
अविनाश जाधव आणि मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यामुळे मीरा भाईंदर आणि मुंबईमधील वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. मीरा भाईंदरमध्ये अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून आज मनसेकडून शहरात मोर्चा काढण्यात येणार आहे. पण पोलिसांकडून या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. मनसे मोर्चावर ठाम होती, त्यामुळे मंगळवारी पहाटे पोलिसांनी अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना ताब्यात घेतले आहे.
अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मराठी बांधवांना या मोर्चासाठी मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे काशिमीरा पोलिसांनी पहाटे साडेतीन वाजता मोठ्या फौजफाट्यासह अविनाश जाधव यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. अविनाश जाधव यांच्याशिवाय पोलिसांनी मनसेच्या काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे. मीरा भाईंदरमध्ये आज सकाळी १० वाजता बालाजी हॉटेलपासून मोर्चाला सुरूवात होणार असून, मिरा रोड स्टेशन परिसरात त्याची सांगता होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.