महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे पिता पुत्रांची पक्ष बांधणी; अमित ठाकरे उद्या कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर! SaamTV
मुंबई/पुणे

महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे पिता पुत्रांची पक्ष बांधणी; अमित ठाकरे उद्या कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर!

मनसे नेते अमित ठाकरे उद्या आणि परवा कल्याण-डोंबिवलीत येणार

प्रदीप भणगे

डोंबिवली : येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांसाठी Municipal elections ठाकरे पिता पुत्रांनी पक्ष बांधणीसाठी शहरे पिंजून काढण्यास सुरवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे MNS अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे दौरा केला तर पुत्र अमित ठाकरे Amit Thackeray यांनी नाशिकचा दौरा केला आहे. पुणे नाशिक नंतर मनसेचे बड्या नेत्यांनी कल्याण डोंबिवलीचा Kalyan Dombivali दौरा फिक्स केला असून येत्या 1 आणि 2 ऑक्टोबर कालावधीत हा दौरा असून मनसे नेते अमित ठाकरे हे देखील येणार आहेत.(MNS leader Amit Thackeray on a tour of Kalyan-Dombivali)

मनसे नेते अमित ठाकरे उद्या आणि परवा कल्याण-डोंबिवलीत येणार असून यावेळी कल्याण ग्रामीण, डोंबिवली आणि कल्याण पूर्व आणि कल्याण पश्चिम या चारी विधानसभा क्षेत्रा मधील पदाधिकारी यांच्या बैठका घेणार आहेत. या दौऱ्यावेळी अमित यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकरBala Nandgaonkar, नितीन सरदेसाई , शिरीष सावंत , अविनाश अभ्यंकर, संजय नाईक उपस्थित रहाणार आहेत.डोंबिवली मधील बैठका कुशाला हॉटेल, प्रीमियम ग्राऊंड आणि सर्वेश हॉल येथे होणार आहेत.

तसेच कल्याण येथील बैठका पूर्व येथील शिवराम पाटील वाडी आणि कल्याण पश्चिमेला जिल्हा मध्यवर्ती शाखा येथे होणार आहे. यामध्ये विभागानुसार शाखा अध्यक्षांसोबत चर्चा होईल. पदाधिकाऱ्यांची बांधणी, प्रभागात झालेली कामे, रिक्त जागा कशा भरायच्या यावर साधारण चर्चा होईल असे जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी सांगितले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT