दसरा शिमग्यात गेल्यास तुमची दिवाळी गोड करु देणार नाही : शेट्टी

raju shetti
raju shetti

सांगली : राज्य शासनाने तातडीने ओला दुष्काळ wet drought जाहीर केला पाहिजे. शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्याला परत पीक घेण्यासाठी पैसे नाहीत. पश्चिम महाराष्ट्रात पूर आला त्याची अद्यापही मदत मिळाली नाही. दसरा आमचा शिमग्यात गेला तर दिवाळी कोणाची गोड करून देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथे महाविकास आघाडीच्या सरकारला दिला. raju-shetti-demands-to-declare-wet-drought-in-maharashtra-sangli-marathi-news-sml80

ऊस वाहतूकदारांच्या समस्या सोडवणूकीसाठी आज (गुरुवार) सांगलीत भव्य मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी raju shetti हे उपस्थित होते. या मेळाव्यास शेट्टी यांनी ट्रॅक्टरमधून येऊन उपस्थिती लावली. ऊस वाहतूकदारांच्या मेळाव्यात शेट्टी यांनी उपस्थितांसमाेर मनाेगत व्यक्त केले.

शेट्टी म्हणाले ऊस तोडणी महामंडळने स्वतः हा मजूर आणावेत आणि पैसे द्यावेत. त्यांनी शिस्त लावण्याची गरज आहे. सरकारने रोजगार हमीतून पैसे द्यावेत. शेतकऱ्याच्या आणि ऊस कामगारांच्या समस्या सोडवाव्यात. जर असे झाले नाही तर ऐन मध्यवर्ती ऊस वाहतूक बंद करून हिसका दाखवू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. केवळ घोषणा करून उपयोग नाही. मदत द्या अन्यथा उग्र आंदोलन छेडू. पीक विम्याची रक्कम तातडीने देण्यात यावी.

raju shetti
नाद खूळा! कस्तुरी सावेकरने माऊंट मनस्लूवर फडकवला तिरंगा

 जलयुक्त शिवारमुळे पूर आला असे म्हणणे उचित नाही. या पुर्वी वसंतदादा पाटील यांच्या काळापासून जलयुक्त शिवार मोहीम सुरू आहे. ती शेतकऱ्याच्या दृष्टीने फायद्याची आहे. घाई गडबडीत कोणताही निर्णय घेणे चुकीचे आहे. 

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com