Raj Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

शिवसेना भवनसमोर हनुमान चालिसा पठणासाठी मनसेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

दोन दिवसापूर्वी मनसेने सेना भवन बाहेर हनुमान चालीसा भोंग्यावर लावली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मनसेच्या (MNS) गुढी पाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थीत केला होता. यावरुन त्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. जर मशिदींवरील भोंग्यावर कारवाई केली नाहीतर आम्ही भोंग्यासमोर हनुमान चालिसा लावणार असल्याचा इशारा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला होता. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी सेना भवन बाहेर हनुमान चालीसा भोंग्यावर लावली होती, त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर कारवाई केली होती. यामुळे आता मनसेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून हनुमान जयंतीला सेना भवनसमोर हनुमान चालिसा पठणासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते यशवंत किल्लेदार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून सेना भवन समोर हनुमान चालिसा पठणासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे. मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

यामुळे मुंबईत आता भोंग्यावरुन मनसे विरुध्द शिवसेना समोर येणार आहेत. मुंबईत मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर भोंगे लावून त्यावर हनुमान चालिसा लावली होती, त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली होती. यावर मनसेने शिवसेनेवर (Shivsena) टीका केल्या होत्या. भोंग्याच्या मुद्द्यावरुन आता मुंबईत राजकारण रंगणार असल्याचे दिसत आहे.

मशिंदीवरील भोंग्यावरुन मनसेच्या पुण्यातील काही पदाधीकाऱ्यांनी पदाचे राजीमाने दिले होते, यावरुन मनसे नेते वसंत मोरे यांनी वेगळी भूमीका मांडली होती. यामुळे राज ठाकरे वसंत मोरेंवर नाराज झाल्याच्या चर्चा सुरु होत्या. मोरे यांचे मनसे पुणे अध्यक्ष पद काढून घेण्यात आले होते. त्यामुळे मोरे नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या, पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

काल (सोमवार) वसंत मोरे यांनी मुंबईत राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीनंतर वसंत मोरे यांनी नाराजी दूर झाली असल्याचे सांगितले. आज राज राज ठाकरे यांची सभा होणार आहे. या सभेला वसंत मोरेंना निमंत्रण दिले असल्याचेही मोरे म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : राज-उद्धव ठाकरे विजयी मेळाव्यासाठी दाखल

Crime: मेहुण्याच्या प्रेमात झाली वेडी, जगात येण्यापूर्वीच बाळाला संपवलं अन् कचऱ्यात फेकलं

Marathi Vijay Melava: ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी वरळी डोमबाहेर मराठी जनसागर|VIDEO

SCROLL FOR NEXT