Bhagat Singh Koshyari  Saam tv
मुंबई/पुणे

MNS News: कोश्यारी नावाचं पार्सल महाराष्ट्रातून परत पाठवा, शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसे आक्रमक

राज्यपालांनी सुधारायच नाही असं ठरवलेलं दिसतंय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, असं त्यांनी म्हटलं. याबाबत मनसेच्या राज्यपालांवर टीकास्त्र सोडलं आहे. कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा, अशी मागणी मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केली आहे.

राज्यपालांनी सुधारायच नाही असं ठरवलेलं दिसतंय. ज्या विषयातलं कळतं नाही तिथं का ज्ञान पाजळता? गडकरीजी, पवारसाहेबांचा आदर्श ज्यांना घ्यायचा त्यांनी घ्यावा. पण छत्रपती शिवाजी महाराज भूतकाळ, वर्तमान व भविष्यकाळात पण आदर्श होते व राहतील. कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा, असं गजानन काळे यांनी म्हटलं.  (Latest Marathi News)

यांना अजून राज्यपाल पदी ठेवता तरी कसं?- संभाजीराजे

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी सातत्याने अशी बडबड का करतात असा मला प्रश्न पडला आहे. मी म्हणतो यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढा. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हात जोडून विनंती आहे की अशी व्यक्ती महाराष्ट्रात आम्हाला नको आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं. 

महाराष्ट्राचं वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि महापुरुषांबद्दल असले घाणेरडे विचार घेऊन कुणी राज्यात येऊच कसं शकतं. यांना अजून राज्यपाल पदी ठेवता तरी कसं? असा संतप्त सवालही संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला.

काय म्हणाले राज्यपाल?

तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला तुमचे आदर्श इथेच मिळतील, असं कोश्यारी म्हणाले.

औरंगागबाद येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केद्रींय मंत्री नितीन गडकरी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून डि.लिट पदवी देण्यात आली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking News : शिक्षक की राक्षस? खराब अक्षरामुळे ८ वर्षांच्या मुलाला दिले मेणबत्तीचे चटके

Maharashtra Live News Update: अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावला

माणिकराव कोकाटे सभागृहात किती वेळ रम्मी खेळत होते? रोहित पवारांनी वेळेचा आकडाच सांगितला|VIDEO

Rajnikanth News : रजनीकांत वर्तमानपत्र उचलायला वाकले अन् तोंडावर आपटले; चाहत्यांची चिंता वाढली

ITR 2025: आयटीआर ३ फॉर्म आता ऑनलाइन पाहता येणार, आयकर रिटर्न भरण्याची सोपी पद्धत काय? वाचा...

SCROLL FOR NEXT