BMC Election 2022: Raj Thackeray will guide the mns workers Twitter/@mnsadhikrut
मुंबई/पुणे

BMC Election 2022: मनसेचं मुंबईत मंथन; राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

BMC Election 2022: आजच्या बैठकीत भाजप-मनसे युतीवरही राज ठाकरे कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

रामनाथ दवणे, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या (Elections 2022) तारखांची घोषणा लवकरच होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निवडणुकीसाठीची तयारी सुरू करण्याचा निर्धार केला आहे. राज्यातील सर्वात महत्वाची आणि प्रतिष्ठेची मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election 2022) निवडणुकीसाठी मनसे (Maharashtra Navnirman Sena) रणशिंग फुंकणार आहे. आज वांद्रे (Bandra) येथील एमआयजी क्लबमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक (Meeting) बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असून आगामी निवडणुकीसाठीच्या रणनितीवर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. (MNS churning in Mumbai; Raj Thackeray will guide the MNS Workers For BMC Election 2022)

हे देखील पहा -

महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi Government) स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पराभव करण्यासाठी भाजप बरोबर मनसे जाईल (BJP - MNS Alliance) अशी चर्चा रंगत असतांना आजच्या बैठकीत यावर ही राज ठाकरे कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

राज ठाकरे हे महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते आहेत, त्यांच्या संभांना प्रचंड गर्दी होते आणि त्यांनी आंदोलनंही गाजतात. मात्र, त्यांची लोकप्रियता आणि सभांमधील गर्दीचं रुपांतर हे मतामध्ये होत नसल्याने निवडणुकीत मनसेला मोठा धक्का बसत आला आहे.

मुंबई महापालिकेत मनसेचा केवळ १ नगरसेवक आहे, विधानसभेतही मनसेचा केवळ एकच आमदार आहे तर मनसेचा एकही खासदार नाही. याशिवाय मनसेची संपुर्ण राज्यात एकाही महापालिकेवर सत्ता नाही त्यामुळे मनसेला आपलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे हे मात्र नक्की.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT