Raj thackeray Saam tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray: राज ठाकरेंची पुन्हा टोलधाड; रस्त्यावर उतरत ठाकरे शैलीत फोडली वाहतूक कोंडी

Raj Thackerya Latest News: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुन्हा एकदा टोलाक्यावर धाड पडली आहे. ठाणे-मुलुंड टेालनाक्यावरील वाहतूक कोंडी पाहून स्वत: रस्त्यावर उतरून काही क्षणात प्रश्न सोडवला.

Vishal Gangurde

आवेश तांदळे, मुंबई

Raj Thackeray Thane-mulund toll naka :

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुन्हा एकदा टोलाक्यावर धाड पडली. ठाणे-मुलुंड टेालनाक्यावरील वाहतूक कोंडी पाहून स्वत: रस्त्यावर उतरून काही क्षणात प्रश्न सोडवला. यावेळी ठाकरेंनी टोलवरील अधिकाऱ्यांनाही सज्जड दम दिला. (Latest Marathi News)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज नाशिक दौऱ्याचा दुसरा दिवस होता. या दौऱ्यात ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर आज शुक्रवारी राज ठाकरेंनी त्यांचा नाशिक दौरा आटोपून पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाले. मुंबईकडे परतताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अन् क्षणात ट्रॅफिक कोंडीचा प्रश्न सोडवला

ठाणे-मुलुंड टोलनाक्यावर राज ठाकरे यांची पुन्हा टेालधाड पाहायला मिळाली. आज शुक्रवारी पुन्हा अडकलेली वाहतूक कोंडी फोडली. मुंबईच्या दिशेने जात असताना ठाणे टोलनाक्यावर हजारोंच्या संख्येने वाहने रांगेत ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे दिसून आले.

रस्त्यावरील ट्रॅफिक पाहून स्वत: राज ठाकरे कारमधून उतरले. त्यांनी रस्त्यावर अडकलेल्या लोकांना रस्ता करुन दिला. त्यानंतर ठाकरे शैलीत टोलवरील अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला.

राज ठाकरेंनी स्वत: रस्त्यावर उतरत काही क्षणात ट्रॅफिकचा प्रश्न सोडवला. गेल्या महिन्यात देखील राज ठाकरेंनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला होता.

खालापूर टोलनाक्यावर दिला होता अधिकाऱ्यांना दम

मागच्या वेळी राज ठाकरेंनी खालापूर टोलनाक्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला होता. मागच्या खालापूर टोलनाक्यावर अडकलेल्या रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली होती. त्यावेळी राज ठाकरेंनी स्वत: टोल नाक्यावर उतरत अधिकाऱ्यांना चांगलाच दम दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

RCB vs GT IPL 2026 Final: अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स 'टाय टाय फिस'; गिल-सुदर्शन-बटलर फ्लॉप

SCROLL FOR NEXT