MNS Chief Raj Thackeray scolded the workers in shivtirth viral video Saam TV
मुंबई/पुणे

Raj Thackeray Birthday: जास्ती आरडाओरडा करू नका, माझा नातू आजारी आहे; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना फटकारलं

Raj Thackeray News: आवाज करू नका, जास्ती आरडाओरडा करू नका... माझा नातू आजारी आहे आणि तो झोपला आहे, असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.

साम टिव्ही ब्युरो

Raj Thackeray Birthday News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा बुधवारी म्हणजेच १४ जून रोजी वाढदिवस आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांनी तयारी सुरु केली आहे.

अशातच शेकडो कार्यकर्ते राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंगळवारी (१३ जून) रात्री शिवतीर्थावर केक घेऊन पोहचले. तेथे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या नावाने घोषणा सुरू केल्या. मात्र, राज ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांना फटकारलं.

आवाज करू नका, जास्ती आरडाओरडा करू नका... माझा नातू आजारी आहे आणि तो झोपला आहे, असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. राज ठाकरे यांनी ही माहिती दिल्यानंतर कार्यकर्ते सुद्धा शांत झाले.

याबाबतचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवर्तीर्थावर मंगळवारी (१३ जून) मध्यरात्रीच्या सुमारास मनसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. राज ठाकरे यांच्या निवास्थानाबाहेर कार्यकर्ते जमले होते.

दरम्यान, गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कार्यकर्त्यांना राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा करता आला नव्हता. त्यामुळे यंदा राज ठाकरे यांचा जंगी वाढदिवस साजरा करण्यासाठी मनसैनिकांनी चांगलीच तयारी केली आहे. ठिकठिकाणी बॅनर्स लावत कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी काही ठिकाणी लावलेले होर्डिंग चर्चेचा विषय ठरत आहेत.

'राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री'

दरम्यान, नवी मुंबईमधील मनसेचे नेते गजानन काळे यांनी राज ठाकरेंचा उल्लेख 'जतनेच्या मनातील मुख्यमंत्री' असा केलेले हॉर्डिंग लावले आहेत. या होर्डिंगची सध्या मुंबईमध्ये चर्चा असल्याचं दिसून येत आहे. वाशी टोलनाक्यावर लावण्यात आलेल्या या होर्डिंगवर भगवा रंग प्राकर्षाने वापरण्यात आला आहे. कपाळावर भगवा टिळा, गळ्यात मफलर घातलेल्या लूकमधील राज ठाकरेंचा फोटो या बॅनरवर दिसत आहे. तसेच राज यांचे पुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरेंचाही फोटो या होर्डिंगवर दिसत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT