Maharashtra Politics: ...पण जो बाळासाहेबांचा झाला नाही, तो मोदींचा तरी होईल का? सामनातून भाजपला तिखट सवाल

Thackeray vs Shinde: ...पण जो बाळासाहेबांचा झाला नाही तो मोदींचा तरी होईल का? असा तिखट सवाल सामना अग्रलेखातून भाजपला विचारण्यात आला आहे.
Uddhav Thackeray Group saamana editorial Slams Eknath Shinde and advice To BJP Maharashtra Politics
Uddhav Thackeray Group saamana editorial Slams Eknath Shinde and advice To BJP Maharashtra PoliticsSaam TV
Published On

Maharashtra Political News: ‘देशात मोदी अन् राज्यात शिंदे’ अशी जाहिरात शिवसेनेनं (शिंदे गट) वर्तमान पत्रांमध्ये छापून आणली. या जाहिरातीनंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले. भाजपच्या काही नेत्यांनी यावरुन नाराजी व्यक्त केली. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सारवासारव करण्यात येत आहे. अशातच ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांना चिमटे काढण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

"महाराष्ट्रातील फडणवीस-शिंदे सरकार हे अजब असे जाहिरातबाज सरकार आहे. आतापर्यंत या सरकारने स्वतःच्या जाहिरातबाजीवर साधारण 786 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून खर्च केल्याचे उघड झाले आहे. खर्च केले यापेक्षा जाहिरातबाजीवर जनतेचे पैसे उधळले असेच म्हणावे लागेल", अशी टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray Group saamana editorial Slams Eknath Shinde and advice To BJP Maharashtra Politics
Ulhasnagar News: कमजोर लोग... शिंदे गटाने बॅनर लावत भाजपला डिवचलं; आमदाराने लगावला टोला

'जो बाळासाहेबांचा झाला नाही तो मोदींचा तरी होईल का?'

"मिंधे गटाची फुकाची जाहिरातबाजी म्हणजे वरवरची रंगसफेदी आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग जाहिरातबाजीने उजळणार नाही. चला एक बरे झाले, शिवसेनाप्रमुखांबाबतचे यांचे प्रेम व आदर म्हणजे निव्वळ ढोंग होते हे कालच्या जाहिरातबाजीने स्पष्ट केले, पण जो बाळासाहेबांचा झाला नाही तो मोदींचा तरी होईल का? आतापर्यंत आपण सगळय़ांनी खूप कल्पक जाहिराती पाहिल्या असतील, पण अशी जाहिरात होणे नाही" असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.

"ही चोरलेल्या बनावट शिवसेनेची जाहिरात"

"मिंधे गटातर्फे (Eknath Shinde) प्रसिद्ध झालेल्या एका पूर्ण पान जाहिरातीने फडणवीसांसह त्यांच्या 105 आमदारांच्या काळजाचे पाणी पाणीच झाले आहे. सर्वच वृत्तपत्रांत कोटय़वधी रुपये खर्च करून अगदी पहिल्या पानावर ‘मोदी-शिंद्यां’च्या फोटोसह जाहिराती प्रसिद्ध झाल्या. त्या जाहिरातीतून देवेंद्र फडणवीस गायब आहेत. ही जाहिरात सरकारी नसून चोरलेल्या बनावट शिवसेनेची आहे", असा घणाघात देखील सामनातून करण्यात आला आहे.

Uddhav Thackeray Group saamana editorial Slams Eknath Shinde and advice To BJP Maharashtra Politics
Cyclone Biparjoy Review Meeting : पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह 7 शहरांसाठी 2500 कोटींची योजना, अमित शाह यांची घोषणा

'जाहिरातीत मोदींचा फोटो, बाळासाहेबांचा कुठे?'

"जाहिरातीत पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो खुबीने वापरला, पण फडणवीस कोठेच नाहीत. जाहिरात सरकारी नसल्यामुळेच फडणवीसांवर फुली मारली असा त्यावर खुलासा असेल, तो तितकासा खरा नाही; पण ‘आम्हीच खरी शिवसेना व आम्हीच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार’ असे ढोल पिटणाऱ्यांच्या या जाहिरातीत मोदी आहेत, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेदेखील पूर्णपणे गायब आहेत. यावर भाजप व शिंदे गटाच्या टिल्ल्या-चिल्ल्या टिनपाट प्रवक्त्यांचे काय म्हणणे आहे?" असा सवालही सामनातून करण्यात आला.

'तो प्रचार या जाहिरातीने संपुष्टात आणला'

"गेल्या फक्त 9-10 महिन्यांत शिंदे यांनी लोकप्रियतेच्या बाबतीत फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर चढाई केली. मोदी राष्ट्रात व शिंदे महाराष्ट्रात लोकप्रिय ठरत असल्याच्या जाहिरातबाजीने भाजपवाल्यांची तोंडे महाराष्ट्रात काळी ठिक्कर पडली आहेत. एक वर्षापूर्वी ‘देशात नरेंद्र व महाराष्ट्रात देवेंद्र’ असा प्रचार सुरू होता. तो प्रचार या जाहिरातीने संपुष्टात आणला". असा टोला देखील सामनातून लगावण्यात आला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com