Ulhasnagar News: कमजोर लोग... शिंदे गटाने बॅनर लावत भाजपला डिवचलं; आमदाराने लगावला टोला

Ulhasnagar News Today: कल्याण लोकसभेत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप यांच्यातील वाद संपताना दिसत नाही.
Ulhasnagar BJP vs Shivsena Baner War
Ulhasnagar BJP vs Shivsena Baner WarSaam TV
Published On

Ulhasnagar News Today: कल्याण लोकसभेत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप यांच्यातील वाद संपताना दिसत नाही. हा वाद उल्हासनगरमध्ये देखील पोहोचला असून उल्हासनगरमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांनी बॅनर लावत भाजपच्या नेत्यांना डिवचलं आहे. तर आता भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी याला उत्तर देत शिवसेनेला टोला लगावला आहे.  (Latest Marathi News)

कल्याण लोकसभेत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध भाजप यांच्यातील वाद संपता संपत नसून या वादाचे पडसाद आता उल्हासनगरपर्यंत पोहोचले आहेत. उल्हासनगरमध्ये शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनर लावत भाजपच्या नेत्यांना डिवचलं आहे.

Ulhasnagar BJP vs Shivsena Baner War
Maharashtra Politics: लोकसभा निवडणुकीत भाजपमुक्त महाराष्ट्र हेच काँग्रेसचं ध्येय, सरकारची पोलखोल करणार - नाना पटोले

"कमजोर लोग ही शिकवा और शिकायत करते है, महान लोग तो हमेशा कर्म की वकालत करते है...! माझा नेता माझा अभिमान" अशा आशयाचे बॅनर उल्हासनगर कॅम्प ४ मध्ये आशान यांनी लावले आहेत. यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उत्तर देत टोला लगावला आहे.

'युतीची सत्ता आल्यावर छोटे छोटे काही कार्यकर्ते आहेत ते आम्हीच शिंदे साहेब (Eknath Shinde) आहोत, आम्हीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत, असा त्यांना गर्व झाला आहे, त्यांना वाटतं आमच्याशिवाय कोणीच नाही', असं भाजप आमदार गणपत गायकवाड म्हणाले आहेत.

Ulhasnagar BJP vs Shivsena Baner War
CM Eknath Shinde Explanation: ती जाहिरात शासनाने दिलेली नाही! या तर लोकांच्या मनातील भावना; मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण

उल्हासनगरमधील 'ती' पाटी व्हायरल

उल्हासनगरमधील शासनाची एक पाटी व्हायरल झाली आहे. यावर आमदार म्हणून गणपत गायकवाड यांच्या ऐवजी शिवसेना (Shivsena) जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांचा उल्लेख आमदार म्हणून केला आहे. यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी नाराजी व्यक्त करत सांगितलं की, "कार्यक्रम करताना सर्व नेत्यांनी याची खात्री केली पाहिजे की आपण कार्यक्रम करतोय आणि एखाद्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये दुसऱ्याचे आमदार म्हणून नाव टाकतो".

"याबद्दल नेत्यांनी विचार केला पाहिजे की आपण ज्या कार्यक्रमाला जात आहोत त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे. मी तिथला आमदार असतानाही तिथे गोपाळ लांडगे यांचा आमदार म्हणून उल्लेख केला गेला. ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. पण त्यांचा आमदार म्हणून उल्लेख केला जातो माझ्या त्यांना शुभेच्छा", असं गणपत गायकवाड म्हणाले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com