Raj thackeray News Saam tv
मुंबई/पुणे

Raj Thackeray Interview: 'बुलेट ट्रेनसाठी १ लाख कोटी कशाला घालवायचे?' राज ठाकरेंचा सवाल

Raj thackeray News In Marathi: गेल्या काही वर्षात मनसे पदाधिकाऱ्यांनी बुलेट ट्रेन भूसंपादन प्रक्रियालाही विरोध केला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याच बुलेट ट्रेन प्रकल्पावर भाष्य करत विरोध दर्शविला आहे.

गोपाल मोटघरे

Raj Thackeray News:

केंद्र सरकारचा बुलेट ट्रेन हा महत्वाकांशी प्रकल्प आहे. केंद्र सरकार या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आग्रही असल्याचे बोललं जात आहे. मात्र, या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या घोषणेपासूनच मनसेचा विरोध आहे. गेल्या काही वर्षात मनसे पदाधिकाऱ्यांनी बुलेट ट्रेन भूसंपादन प्रक्रियालाही विरोध केला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी याच बुलेट ट्रेन प्रकल्पावर भाष्य करत विरोध दर्शविला आहे. (Latest Marathi News)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १०० व्या मराठी नाट्यसंमेलनामध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये त्यांनी नाटक, राजकारण , मराठी भाषा अशा विविध मुद्द्यावर मत व्यक्त केलं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मराठी माणसांनी दक्ष असलं पाहिजे : राज ठाकरे

बुलेट ट्रेन प्रकल्पावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, 'मला अजूनही बुलेट ट्रेनचं कळलं नाही. मुंबईहून दोन तासांत अहमदाबादमध्ये बुलेट ट्रेनने जाणार. पण जाऊन काय करणार? ढोकळा खाऊन परत येणार. मुंबईतही चांगला मिळतो. त्यासाठी १ लाख कोटी कशाला घालवायचे? मराठी माणसांचं चारही बाजूला लक्ष असलं पाहिजे. मराठी माणसांनी दक्ष असलं पाहिजे. मी मराठी माणसांना सतत सांगत राहणार'.

महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत : राज ठाकरे

'संपूर्ण इतिहास भूगोलावर अवलंबून आहे. भूगोल म्हणजे जमीन. तुमची जमीन ताब्यात घेणं सुरु आहे. मुघलांनी देखील हेच केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी २८ किल्ले दिले. ते कशाला दिले? तर जमीनीसाठी. त्या काबीज करण्यासाठी लढाया झाल्या, त्याला आपण इतिहास म्हणतो. आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे. राज्यातील जमीन लढाया करून घेतल्या जायच्या. आता चालाखीने हडपल्या जात आहेत. तुमची जमीन, भाषा निघून गेली तर कोण तुम्ही? न्हावाशेवा- शिवडी सी-लिंक होत आहे. यामुळे रायगडचं नुकसान होईल, असा दावा राज ठाकरेंनी केला.

तर मुंबई बरबाद व्हायला वेळ लागणार नाही : राज ठाकरे

'आपण जे इतिहास वाचत आहोत, तो सर्व भुगोलावर आधारित आहे. आज राज्याचा भूगोल अडचणीत आहे. पूर्वी महाराष्ट्रातील जमीन युद्ध करून घेता येत होती. मात्र आज तुमची जमीन न कळत विकत घेतली जात आहे. आपण जातीपातीत इतके मश्गूल झालो की, आपण स्वतः काय आहोत, हे विसरून बसलोय. यामुळे मुंबई बरबाद व्हायला वेळ लागणार नाही. पुणेही बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, असेही राज ठाकरे म्हणाले.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : राज ठाकरे-उद्धव ठाकरे मेळाव्यासाठी रवाना, थोड्याच वेळात तोफ धडाडणार

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT