आगामी विधानसभा स्वबळावर लढण्याचा नारा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. बंद दाराआडा ही चर्चा झाली. त्यामुळे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या.
यावेळी ठाकरे शिंदेंमध्ये युतीबाबत चर्चाही झाल्याचं कळंतय. त्यामुळे आगामी काळात मनसे-शिवसेना युतीचं बिगुल वाजण्याचा अंदाज आहे. मात्र या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी निशाणा साधत भेट म्हणजे एक मोठं डिल असल्याचं म्हटलंय. संजय राऊत म्हणाले की, कितनी बडी डील हो सकती है. यावर माणसे प्रवक्ते संदीप देशपांडे म्हणाले की, डील सुचते कारण राऊत ढील.
लोकसभा निवडणुकीत मनसेनं भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर मात्र मनसेनं महायुतीसोबत फारकत घेतल्याचं पाहायला मिळालं.त्यात नुकत्याच पार पडलेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी स्वबळाचा नारा दिला. एकीकडे आक्रमक होणारे उद्धव ठाकरे आणि मविआकडून होणारे शाब्दिक हल्ले यातून मार्ग काढायचा झाल्यास महायुतीला आता चौथ्या भिडूची गरज आहे.
राज ठाकरेंच्या रुपानं महायुतीला शहरी पट्ट्यात मनसेचा किमान मतं विभाजनासाठी नक्कीच फायदा करता येऊ शकतो. यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरेंची भेट झाल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगतेय. मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं जातंय.
मात्र सध्या राज्यात घडणाऱ्या घडामोडी पाहता भेटीमागे राजकीय अर्थच दडल्याची चर्चा आहे. त्यामुळे मनसे महायुतीला टाळी देणार की टाळणार याकडे लक्ष आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.