Sushil Kedia Office Attack Saam Tv
मुंबई/पुणे

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Sushil Kedia Office Attack: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ट्वीट करत आव्हान करणाऱ्या उद्योजक सुशील केडिया यांचे मुंबईतील ऑफिस मनसे कार्यकर्त्यांनी फोडले. त्यांच्या कार्यालयावर जोरदार दगडफेक करण्यात आली.

Priya More

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना धमकी देणं उद्योजक सुशील केडिया यांना चांगलंच महागात पडले. मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईमधील केडिया यांच्या ऑफिसची तोडफोड केली. संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी केडिया यांच्या ऑफिसवर दगड आणि नारळ फेकले. केडियांच्या ऑफिसबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. यावेळी पोलिसांनी या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

मुंबईमध्ये मराठी भाषेच्या मुद्द्याने आता राजकारण चांगलेच तापले आहे. मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरून जोरदार वाद सुरू झाला आहे. या वादात केडियानोमिक्सचे संस्थापक आणि उद्योजक सुशील केडिया यांनी उडी घेतली. त्यांनी थेट राज ठाकरे यांना सोशल मीडियावर पोस्ट करत धमकी दिली होती.'मी मराठी शिकणार नाही तुम्हीला काय करायचे ते बोल.' अशा शब्दात पोस्ट करत त्यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिलं होतं. यामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी आज सकाळी त्यांचे ऑफिस फोडले. त्यांच्या ऑफिसवर नारळ आणि दगड फेकत तोडफोड केली.

सुशील केडिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. यामध्ये त्यांनी राज ठाकरे यांना टॅग करत लिहिले की, 'मुंबईमध्ये ३० वर्षांपासून राहिल्यानंतर सुद्धा मला मराठी व्यवस्थित समजत नाही आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे मी प्रतिज्ञा केली आहे की जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. तुम्हाला काय करायचे ते बोल?.'

या ट्विटनंतर सुशील केडिया यांनी आणखी एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, 'ड्रामा बंद कर तुमचे दोन-तीन गुंडे १०-१२ फटके मारतील तर मारतील. आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर आणि जोपर्यंत तू हात जोडून माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण केलं तर, तुझं काय राहणार?' त्यांची ही वादग्रस्त पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

SCROLL FOR NEXT