Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Pimpari Chinchwad Ganpati Visarjan: गणपती विसर्जनादरम्यान पिंपरी चिंचवडमध्ये भयंकर घटना घडली. गणरायाला निरोप देत असताना चौघांचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली.
Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू
Ganpati VisarjanSaam Tv
Published On

गोपाळ मोटघरे, पिंपरी

पिंपरी -चिंचवडमध्ये गणपती विसर्जनला गालबोट लागल्याची घटना घडली. लाडक्या गणरायाला निरोप देत असताना मोठी दुर्घटना घडली. गणपती विसर्जन करत असताना चौघे जण नदीत बुडाले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. तर दोघे जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. ही घटना चाकण पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गणपती विसर्जन करताना तीन वेगवेगळ्या घटनेत पाण्यात बुडून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दोन जण अजूनही बेपत्ता आहेत. चाकण पोलिस स्टेशन हद्दीत अनंत चतुर्दशीच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली. चाकण पोलिस स्टेशन हद्दीतील वाकी बुद्रुक या ठिकाणी गणपती विसर्जन करत असताना २१ आणि २७ वर्षीय तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा तरुणाचा मृतदेह अग्निशमन दलाने नदीपात्रातून बाहेर काढला आहे. तर दुसऱ्या तरुणाचा शोध अग्निशमन दल घेत आहे.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू
Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

तर शेल पिंपळगाव येथे गणपती विसर्जन करताना एका ४५ वर्षाचा व्यक्तीचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. तर चाकण पोलिस स्टेशन हद्दीतील बिदरवाडी या ठिकाणी गणपती विसर्जन करत असताना एक व्यक्ती विहिरीत बुडाला. या व्यक्तीचा मृतदेह देखील विहिरी बाहेर काढण्यात आला आहे. ३ वेगवेगळ्या घटनांमध्ये अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी दिली आहे

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू
Pune Ganpati Visarjan: दगडूशेठ गणपतीची बैलगाडी मिरवणूक; केरळ मंदिराच्या प्रतिकृतीसह आकर्षक रथ सजवला|VIDEO

दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील आसनगावमध्ये गणपती विसर्जनादरम्यान ३ तरुण वाहून गेले. आसनगावच्या मुंडेवाडीमध्ये ही घटना घडली. आसनगाव येथील मुंडेवाडी या ठिकाणी राहणारे कुलदीप जाखेरे (वय ३२ वर्षे), दत्तू लोटे (वय ३० वर्षे) आणि प्रतीक मुंढे (वय २३ वर्षे) हे तिघे जण गणपती विसर्जनासाठी भारंगी नदीत उतरले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघेही वाहून गेले. त्यांचा शोध घेतला जात आहे.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू
Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com