Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Maharashtra Political News : मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीनंतर मराठी अभिनेत्याने सवाल केला आहे. अभिनेता आस्ताद काळेने सोशल मीडियावर पोस्ट करत सवाल केला.
aastad kale
aastad kale news Saam tv
Published On
Summary

आस्ताद काळे यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या टेस्ला खरेदीवर थेट प्रश्न उपस्थित

"एवढा पैसा कुठून आला काका?"असा प्रश्न आस्ताद काळेने विचारला

सामान्य नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत असल्याचे काळेने म्हटलं

आस्तादची सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

राज्यात बहुतांश ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावं लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यावरून अनेक नागरिकांकडून सरकावर संताप व्यक्त केला जातो. अनेक मराठी कलाकारही सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून रस्त्यातील खड्ड्यांवर व्यक्त होत असतात. अभिनेता आस्ताद काळेनेही मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी नातवासाठी टेस्ला कार विकत घेतली. सरनाईक यांच्या टेस्ला कार खरेदीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली. मंत्री सरनाईक यांच्या टेस्ला कार खरेदीवर आस्ताद काळेने प्रश्न चिन्ह उपस्थित केले.

aastad kale
Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

अभिनेता आस्ताद काळे याने पोस्टमध्ये म्हटलं की, 'नातवासाठी घेतलेल्या टेस्ला रुपी खेळण्याची किंमत किती आहे काका? प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर भरणाऱ्या तरीही खड्ड्यांमधून कष्टाच्या पैशांतून घेतलेली वाहन चालवावी लागणाऱ्या आमच्यासारख्या नागरिकांच्या जीवाची किंमत किती आहे हो का?'

आस्तादच्या पोस्टमध्ये पुढे म्हटलं की, 'ता. क. - एवढा पैसा कुठून आला काका? तुमच्या लाडक्या नातवाला ते खेळणं घोडबंदर रस्त्यावर न्यायला सांगाल ना... बाकी लाल दिव्यांचा ताफा बरोबर न घेता. उत्तरं नसतीलच..आपण प्रश्न विचारत राहायचं, असं कॅप्शन त्याने पोस्टला दिलं आहे.

aastad kale
Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

अभिनेता आस्तादच्या पोस्टवर अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. एकाने म्हटलं की, बरोबर कार्यक्रम केला आहेस'. हीच तर शोकांतिका आहे की, आता उत्तरे मिळणार नाहीत. कारण आता वॉशिंग मशीनसोबत आहे, अशा कंमेंट चाहत्यांनी आस्तादच्या पोस्टवर केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com