BJP  Saam Tv
मुंबई/पुणे

Saam Exclusive : भाजपकडून विधानपरिषदेसाठी कोणाला लॉटरी लागणार? 'ही' ४ नावे आघाडीवर,VIDEO

maharashtra mlc polls : भाजपकडून विधानपरिषदेसाठी कोणाला लॉटरी लागणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. विधानपरिषदेसाठी भाजपच्या ४ नेत्यांची नावे आघाडीवर आहेत.

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानपरिषदेतील ११ आमदार आज गुरुवारी २७ जुलै रोजी निवृत्त झाले. त्यानंतर विधानपरिषदेतील ५ जागा भाजपला मिळणार आहेत. या जागांसाठी भाजपकडे इच्छुकांची गर्दी वाढली आहे. भाजपच्या ५ जागांवर कोणाला लॉटरी लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजपकडून ५ जागांसाठी ११ लोकांच्या नावाचा विचार सुरु आहे. त्यामुळे भाजपकडून विधानपरिषदेसाठी कोणाला संधी मिळणार,याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी ११ लोकांच्या नावाचा विचार सुरु आहे. भाजपच्या कोट्यातून महादेव जानकर यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर इतर ४ जागांसाठी १० नावे चर्चेत आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या दोघांना विधानपरिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांच्या नावाचा विचार सुरु आहे. चार जागांमध्ये एका महिलेला संधी मिळणार हे निश्चित मानलं जात आहे,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

विधानपरिषदेच्या उमेदवारांची संभाव्य यादी -

रावसाहेब दानवे

पंकजा मुंडे

हर्षवर्धन पाटील

चित्रा वाघ

परिणय फुके

निलय नाईक

योगेश टिळेकर

माधवी नाईक

सुधाकर कोहळे

अमित गोरखे

काँग्रेसकडून कोणाला मिळणार संधी?

विधानपरिषदेच्या ११ पैकी ३ जागा काँग्रेस लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या जागांवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा सुरु आहे.

काँग्रेसमधील विधानपरिषदेच्या संभाव्य उमेदवारांची नावे -

माणिकराव ठाकरे

नसीम खान

संध्या सव्वालाखे

काकासाहेब कुलकर्णी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bonus Called In Marathi: दिवाळीला मिळणाऱ्या बोनसला मराठीत काय म्हणतात? 99 टक्के लोकांना माहितच नाही?

Diwali Dhanteras : धनतेरसच्या दिवशी धण्याची खरेदी का केली जाते? जाणून घ्या

Shocking News : संतापजनक! शासकीय बाल सुधारगृहात १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

Maharashtra Live News Update: बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन

अतिरिक्त पोलीस महासंचालकांनंतर सहायक उपनिरीक्षकांनी आयुष्य संपवलं; पोलीस दलात पुन्हा खळबळ, हरियाणात नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT