MLA Ganpat Gaikwad saam tv
मुंबई/पुणे

MLA Ganpat Gaikwad: आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी

MLA Ganpat Gaikwad: पैसे भरूनही वीज कनेक्शन न मिळाल्याने कल्याण पूर्व आशाळे परिसरातील काही इमारतींमधील रहिवाशांना अंधारात राहावे लागत आहे.

Chandrakant Jagtap

>>अभिजीत देशमुख

MLA Ganpat Gaikwad: कल्याणमध्ये पैसे भरूनही वीज कनेक्शन मिळत नसल्याने नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. याबबात कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली आहे.

सहा महिन्यापूर्वी पैसे भरूनही वीज कनेक्शन न मिळाल्याने कल्याण पूर्व आशाळे परिसरातील काही इमारतींमधील रहिवाशांना अंधारात राहावे लागत आहे. यासंदर्भात कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी आज महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. (Mumbai News)

जोपर्यंत या रहिवाशांना वीज पुरवठा होत नाही तोपर्यंत येथून जाणार नाही अशी भूमिका त्यांनी यावेळी घेतली. टेबल खालून पैसे घेतलेल्यांना मीटर देण्यात येते आणि सरकारी नियमानुसार ज्यांनी पैसे भरले त्यांना मीटर दिले जात नाही असा गंभीर आरोप यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी केला. (Latest Marathi News)

आपल्याकडे याबाबतचा व्हिडिओ आसल्याचा दावा देखील त्यांनी केला. यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल आणि या रहिवाशांना तत्काळ वीज कनेक्शन देण्यात येईल असे आश्वासन दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जतच्या टोरंट प्रकल्पाविरोधात शेकाप आक्रमक; वृक्षतोड थांबवण्याची मागणी

३-४ महिन्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील, गणेश नाईकांच्या विधानाचा नेमका अर्थ काय?

Smartphone Tips : मोबाईल अपडेट केल्यानंतरही रीस्टार्ट का करावे? जाणून घ्या महत्त्वाचे फायदे

Gold Silver Purity : तुम्ही खरेदी केलेलं सोनं खरे की बनावट? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने मिनिटात करा चेक

कपडे ठेवताना तुम्हीही करताय का 'ही' मोठी चूक? कपाट खराब होण्याआधी आजच जाणून घ्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT