Ajit Pawar: 'अरे बापरे! एवढ्या मोठ्या पक्षाने पाठिंबा दिला धाबेच दणाणले' अजित पवारांनी उडवली मनसेची खिल्ली

Ajit Pawar: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आज पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली.
Ajit Pawar
Ajit Pawarsaam tv
Published On

Ajit Pawar: पुण्यातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी मनसेने भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबात अजित पवारांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी 'अरे बापरे! एवढ्या मोठ्या पक्षाने पाठिंबा दिला धाबेच दणाणले' अशी खिल्ली उडवली. अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर आज पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. "या घटनेला ३ वर्ष होऊन गेले आहेत. मी त्यावर बोलणार नाही, हे मी सांगितले आहे, असे अजित पवार म्हणाले. यानंतर त्यांना पुन्हा एकादा पाहाटेच्या शपथविधीविषयी प्रश्न विचारल्यानंतर 'मी बोलणार नाही म्हणजे बोलणार नाही' असे म्हणत त्यांनी विषय टाळला. (Latest Marathi News)

Ajit Pawar
Kasaba Bypoll Election : मनसेचा पाठिंबा नेमका कुणाला? मविआच्या उमेदवाराची थेट मनसे कार्यालयात एंट्री

'फडणवीसांनी हे वक्तव्य का केलं माहीत नाही'

अजित पवार म्हणाले, देवेंद्रजी यांचं बोलणं माझ्या कानावर आलेलं आहे. मी देवेंद्र जी यांना विचारेल की त्यांनी यावेळी असं स्टेटमेंट का केलं. मी देवेंद्रजी यांच्याशी बोललो नाही. त्यांनी हे वक्तव्य का केलं मला माहीत नाही'. तसेच मी उद्या होणाऱ्या अधिवेशनाच्या तयारीत लागलेलो आहे. मला त्या विषयावर बोलायचे नाही. मी संविधान मानतो तो माझा आधिकार आहे, असे पवार म्हणाले. (Latest Political News)

Ajit Pawar
Ajit Pawar : 'त्याविषयी मी काहीच बोलणार नाही', देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांनी बोलणं टाळलं

गिरीश बापट यांच्याविषयी काय म्हणाले?

भाजपचे नेते गिरीश बापट यांनी आज कसब्यात भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारात सहभाग घेतला. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, काल फडणवीस त्यांना भेटले. त्यांनी बापट यांना सांगितले की कसबामध्ये काळजीचे वातावरण आहे. यानंतर आजारी जरी असले तरी त्यांनी मेळावा केला आहे. पक्षाने त्यांना आग्रह केला असे वाटते. बापट यांचा स्वभाव मला माहिती आहे. त्यांनी एक गोष्ट ठरवली की ते पूर्ण करतात. देवेंद्रजी यांनी काही सांगितलं म्हणून ते बाहेर पडले असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com