कपडे ठेवताना तुम्हीही करताय का 'ही' मोठी चूक? कपाट खराब होण्याआधी आजच जाणून घ्या सोप्या टिप्स

Saam Tv

कपडे ठेवण्याची योग्य पद्धत

हिवाळा सुरू होताच स्वेटर, जॅकेट आणि जड कपड्यांमुळे कपाट भरून जाते. कमी जागेत कपडे कसे व्यवस्थित ठेवावे, जाणून घ्या सोप्या ट्रिक्स.

how to organize clothes | piterest

थेट वापरू नका

बेड किंवा बॉक्समधून जुने हिवाळ्यातले कपडे बाहेर काढल्यावर थेट घालू नका. त्यांना काही वेळ उन्हात ठेवा, ज्यामुळे त्यातील दुर्गंधी आणि कीटक निघून जातील.

how to organize clothes | pinterest

वॉर्डरोबची स्वच्छता

जे कपडे तुम्ही गेल्या वर्षी एकदाही घातले नाहीत, त्यांना बाजूला करा. अनावश्यक कपडे कपाटात विनाकारण जागा घेरतात, त्यामुळे आधीच निरुपयोगी कपडे वेगळे करा.

how to organize clothes | pinterest

स्वेटर आणि जॅकेटसाठी वेगळी जागा

जड कपडे एकावर एक ठेवल्यास एक स्वेटर काढताना सगळे कपडे बाहेर पडतात. त्याऐवजी स्वेटर, जॅकेट आणि शॉलसाठी वेगवेगळे सेक्शन्स बनवा जेणेकरून गोंधळ उडणार नाही.

how to organize clothes | pinterest

स्वेटरसाठी हँगर्सचा वापर टाळा

लोकरीचे स्वेटर हँगरला अडकवून ठेवल्याने त्याचे खांदे आणि आकार बिघडू शकतो. स्वेटर नेहमी नीट फोल्ड करून शेल्फमध्ये ठेवा.

how to organize clothes | pinterest

हेवी जॅकेट आणि कोट्ससाठी हँगर्स

हिवाळ्याचे हेवी जॅकेट आणि लांब कोट्समध्ये सुरकुत्या पडू नयेत म्हणून त्यांना हँगरमध्ये टांगून ठेवणे योग्य ठरेल. मात्र, स्वेटर मात्र नेहमी फोल्ड करूनच ठेवा.

how to organize clothes | pinterest

मोजे, मफलरसाठी स्टोरेज बॉक्स

मोजे, मफलर, स्कार्फ आणि टोपी यांसारख्या छोट्या गोष्टी वारंवार हरवतात किंवा सापडत नाहीत. यासाठी त्यांना एका स्वतंत्र स्टोरेज बॉक्समध्ये एकत्र ठेवा.

how to organize clothes | pinterest

स्मार्ट ट्रिक्समुळे कपडे राहतील सुरक्षित

या सोप्या टिप्समुळे तुमचे कपाट नेहमी नीटनेटकी आणि स्वच्छ दिसेल.

how to organize clothes | pinterest

NEXT : मिठाईऐवजी ड्रायफ्रूट्स आवडीने खाताय? थांबा, बाजारात आला बनावट सुकामेवा, असं ओळखा खरं काजू-बदाम

Dry Fruits Buying Tips | Saam Tv
येथे क्लिक करा