MLA Ashwini Jagtap Vs Shankar Jagtap: Saamtv
मुंबई/पुणे

Assembly Election 2024: दीर -भावजय संघर्ष टळला! अश्विनी जगताप यांची निवडणुकीतून माघार; चिंचवडमध्ये शंकर जगतापांची उमेदवारी फिक्स?

MLA Ashwini Jagtap Vs Shankar Jagtap: चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीचा वाद मिटला आहे. विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.

Gangappa Pujari

नितीन पाटणकर, मुंबई

Chinchwad Assembly Election 2024: राज्याच्या राजकारणात सध्या विधानसभा निवडणुकांचे धुमशान सुरु आहे. विधानसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरु असतानाच उमेदवारीवरुन कौटुंबिक कलह, भावाभावांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. असाच वाद पिंपरी चिंचवडमध्ये जगताप कुटुंबियांमध्ये रंगणार असल्याची चिन्हे दिसत होती. याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली असून अश्विनी जगताप यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे, त्यामुळे शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीचा वाद मिटला आहे. भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. माझ्या ऐवजी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना चिंचवड मधून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे.

आज पुण्यामध्ये आमदार अश्विनी जगताप, त्यांचे दीर आणि भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी माझ्याऐवजी भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांना चिंचवड मधून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी अश्विनी जगताप यांनी केली. त्यामुळे आता जगताप कुटुंबातील वादही टळणार असून शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शंकर जगताप हे दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांचे बंधु आहेत. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीवेळी ते विधानसभा लढण्यास इच्छुक होते. मात्र त्यावेळी पक्षाने अश्विनी जगताप यांना संधी दिली. त्यामुळे आता पुन्हा एकदा चिंचवड विधानसभेच्या उमेदवारीवरुन जगताप कुटुंबामध्ये रस्सीखेच सुरु होती. अशातच अश्विनी जगताप यांनी उमेदवारीसाठी शंकर जगताप यांचे नाव पुढे केल्याने कौटुंबिक संघर्ष टळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: हाजीर हो! राहुल गांधींच्या अडचणी वाढणार, सावरकरांच्या बदनामी प्रकरणात न्यायालयाचं समन्स

Uddhav Thackeray : मुंबईवर घाला घातला तर हम काटेंगे; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल,VIDEO

Watch Video: पावले धरती परतीची वाट! अरं 'देवा' भाऊच्या सभेकडे बहिणींनी फिरवली पाठ

Kolhapur Politics : पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा प्रकार; कोल्हापुरात प्रचार पत्रकावर तांदूळ, कापलेला लिंबू, अंगारा

Inflation: महागाई कमी होणार? नेटकऱ्याच्या विनंतीनंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी दिले मोठे संकेत

SCROLL FOR NEXT