MVA ON BJP: 'भाजपचा रडीचा डाव, मतदार यादीत मोठा घोळ..' मविआचे गंभीर आरोप, सरपंचाचे व्हिडिओ दाखवत भाजपला घेरलं!

MVA Press Conference On Assembly Election 2024: भारतीय जनता पक्षासह महायुतीवर गंभीर आरोप केलेत. एका महिला सरपंचाचा व्हिडिओ दाखवत मतदार यादीतून लोकांचे नावं काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मविआने केला आहे.
MVA ON BJP: 'भाजपचा रडीचा डाव, मतदार यादीत मोठा घोळ..' मविआच्या आरोपाने खळबळ
MVA Press Conference On Assembly Election 2024: Saamtv
Published On

सुनिल काळे, मुंबई

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज महाविकास आघाडीची महत्वाची पत्रकार परिषद पार पडली. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार आदी नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भारतीय जनता पक्षासह महायुतीवर गंभीर आरोप केलेत. एका महिला सरपंचाचा व्हिडिओ दाखवत मतदार यादीतून लोकांचे नावं काढण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मविआने केला आहे.

मविआचे भाजपवर गंभीर आरोप!

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच आज महालिकास आघाडीने पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्षासह महायुतीवर गंभीर आरोप केलेत. बुलढाणा जिल्ह्यातील तेलाना ग्रामपंचायतीच्या सरपंच (तालुका, चिखली) श्रीमती किरण गाडेकर यांचा एक व्हिडिओ दाखवत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मतदार याद्यांमधून नावे वगळण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या महिला सरपंचांनी त्यांच्यासह गावातील ६० मतदारांचे नाव यादीतून वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा केला आहे.

मतदार यादींमध्ये मोठा घोळ

यावरुनच मविआच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप रडीचा डाव खेळत आहे. मतदार यादीतून लोकांचे नावं काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दम असेल तर समोरासमोर लढा. पराभवाच्या भितीने भाजपकडून हे पाप होत आहे. हे सर्व षडयंत्र फडणवीस राबवत‌ आहे. फॉर्म ७ मार्फत‌ आमचे मतदार कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. याबाबत निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार करणार आहोत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

MVA ON BJP: 'भाजपचा रडीचा डाव, मतदार यादीत मोठा घोळ..' मविआच्या आरोपाने खळबळ
Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

लोकशाहीला काळीमा

"लोकसभा निवडणुकीत ज्याठिकाणी महाविकास आघाडीला मत जास्त आहेत, त्या भागात मतदार कमी करण्याचा‌ प्रयत्न होतोय. मतदारांचा हक्क नाकारण्याचा प्रयत्न होतोय. हा लोकशाहीला ‌काळीमा आहे. फॉर्म नंबर ७ ही प्रक्रिया मूळात संशयास्पद आहे. कारण त्याचा कुठलाही डेटा आयोगाकडे नाही. सिन्नरमध्ये ५ हजार नावं अशीच गायब झाली, जिवंत‌ असलेल्या लोकांना मृत दाखवण्यात आले. व्होटर लिस्ट नीट प्रिंट केलेली नसते, मग डिजिटल इंडियाच्या गप्पा का?" असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

MVA ON BJP: 'भाजपचा रडीचा डाव, मतदार यादीत मोठा घोळ..' मविआच्या आरोपाने खळबळ
Maharashtra Politics: अतुल बेनके घड्याळावर लढणार, प्रचाराला सुरुवात; म्हणाले दादा-साहेबांना एकत्र आणणार!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com