जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे "दात घशात गेले!" - आमदार आशिष शेलार Saam Tv
मुंबई/पुणे

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे "दात घशात गेले!" - आमदार आशिष शेलार

राजकीय द्वेषातून आघाडी सरकारने राज्याच्या शेतकऱ्यांचा अपमान केला, शेतकऱ्यांचे नुकसान केले, आता तुमचेच दात तुमच्या घशात गेले ना? असा टोला शेलारांनी लगावला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत, मुंबई

मुंबई: जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली. (mla ashish shelar slams to mahavikash aaghadi government about irrigation scheme)

हे देखील पहा -

ते पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली. त्यावेळी आघाडी कडून आरोप करण्यात आले होते की, या योजनेच्या कामात गुणवता नाही, सिंचन क्षमता वाढली नाही, पारदर्शकता नाही. मग चौकशीअंती आता तुमच्या जलसंधारण विभागाने काय उत्तर दिली? जलयुक्त शिवारमुळे संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली, नगदी पिकांमध्ये शेतकऱ्यांची कमाई वाढली, लागवडीचा क्षेत्रफळ वाढले, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली, यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरली होती आणि फोटो जीओ मँपिंग केले गेले त्यात गुणवत्ता आणि पारदर्शकता ठेवली गेली, आणि याच्यामध्ये गावकऱ्यांची सहभागिता होती.

मग या सगळ्या गोष्टी जलसंधारण विभाग चौकशीअंती बोलत असेल तर, केवळ अहंकारापोटी आणि राजकीय द्वेषापोटी तुम्ही या जलयुक्त शिवारला बदनाम केलं, हे सिध्द होते. राजकीय द्वेषातून आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान केला, शेतकऱ्यांचे नुकसान केले, आता तुमचेच दात तुमच्या घशात गेले ना? असा सणसणीत टोला आमदार अँड आशिष शेलार यांनी आघाडी सरकारला लगावला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शाळेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, मुख्याधापकाचं हैवानी कृत्य उघड

भव्य विसर्जन मिरवणुकीत बाप्पावर फुलांचा वर्षाव; पाहा डोळ्यांची पारणं फेडणारं दृश्य|VIDEO

Anant Chaturdashi 2025 live updates : माजीं खासदरनवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्याकडून गणरायाचे विसर्जन

Marriage Tips : नवरा-बायकोचं नातं तुटण्यापूर्वी व्हा सावध; या गोष्टींमुळे वाढतो घटस्फोटाचा धोका

Ashane Waterfall : रायगडचे सौंदर्य वाढवणारा 'आषाणे' धबधबा, तुम्ही कधी पाहिला का?

SCROLL FOR NEXT