मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election)पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. ही जागा जिंकण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडी आणि शिवसेनेने एका एका आमदारांच्या मताची जुळवाजुळव सुरू केली आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची मतेही महत्वाची आहेत. या राजकीय घडामोडीवर समाजवादी पक्षाचे नेते, आमदार अबू आझमी (abu azmi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Rajya Sabha Election)
राज्यसभेचं राजकीय गणित जुळवण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीने पावलं उचलायला सुरूवात केली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष मतदान कोणाला मतदान करणार यावर आमदार अबू आझमी यांनी माध्यमांशी संवाद साधत उत्तर दिले आहे.
अबू आझमी म्हणाले, 'समाजवादी पक्ष हा डॉ. राममनोहर लोहिया यांच्या विचारावर चालतो.आम्ही राजकारण सुरू केल्यापासून सांप्रदायिक शक्तींना मदत केली नाही. आम्ही भूमिका बदलणारे लोक नाही. आम्ही कधीच भाजप-शिवसेना पक्षांना पाठिंबा दिला नव्हता. मात्र, उद्धव ठाकरे यांनी वीस वर्ष भाजपसोबत राहून चूक केली. आता पुढील तीस वर्ष धर्मनिरपेक्षांसोबत राहून सत्ता स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयाचे आम्ही टाळ्या वाजवून स्वागत केले'.
पुढे अबू आझमी म्हणाले, 'मात्र, गेल्या अडीच वर्षात काँग्रेस आणि राष्ट्रावादीकडून मुस्लिमांचा पाच टक्के आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यात आला नाही. अल्पसंख्याक आयोग अजून तयार करण्यात आला नाही. उर्दू अकॅडमी आतापर्यंत झाली नाही. हज कमिटी तयार करण्यात आली नाही. अशा अनेक बाबी पूर्ण झाल्या नाहीत. धर्मनिरपेक्ष सरकारकडून अशी अपेक्षा नव्हती. आम्ही सरकारला धर्मनिरपेक्ष मुद्द्यांवरून प्रश्न विचारला आहे. याबाबत आम्ही त्यांना पत्र लिहिलं आहे. आम्ही त्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत. तसेच राज्यसभा निवडणुकीत कोणाला मतदान करायचं यासाठी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत चर्चा झाली आहे. मतदान कोणाला करायचं यासाठी अखिलेश यादव यांनी वेट अँड वॉच असं आहे'.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.