तर भोंगा उतरविलाच पाहिजे; राज्‍यमंत्री बच्चू कडू

तर भोंगा उतरविलाच पाहिजे; राज्‍यमंत्री बच्चू कडू
Bachchu Kadu
Bachchu Kadu Saam Tv
Published On

बुलढाणा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा समोर आणल्यानंतर राज्यात धार्मिक वातावरण चांगलेच पेटले होते. राजकारणात देखील याचे मोठे पडसाद दिसत आहेत. भोंग्याचा मुद्दा राजकीय हत्यार बनवण्याचे प्रयत्न राज्यात होत आहेत. दरम्यान, यावर राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी शेगाव येथे आयोजित कार्यक्रमात भोंग्‍याच्‍या मुद्यावर विचार मांडत मनसेवर निशाणा साधला आहे. (buldhana news Minister Bachchu Kadu statment for bhonga matter)

Bachchu Kadu
वरातीत घोडा नाचवणं अंगलट, नवरदेवाचा पाय मोडला; स्ट्रेचरवर बसून लावलं लग्न

शेगाव (Shegaon) येथील अब्दुल कलाम आझाद उर्दू शाळेच्या आवारात आयोजित एका ईद मिलनाच्या कार्यक्रमात भोंग्याबाबत वेगळ्या पद्धतीने आपले विचार मांडले. सलीम मेंबर, जुबेर सहारा, शेख हाशम, फिरोज खान, अमीन खान व मित्र मंडळींकडून शेगाव येथील मौलाना अबुलकलाम आझाद उर्दू शाळेच्या मैदानात रात्री पार पडलेल्या या ईद मिलनाच्या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून स्वातीताई वाकेकर, तर प्रमुख अतिथी म्हणून मुफ्ती जुनेद, मौलवी नियमात, हाफिज शमशाद, ज्ञानेश्वदादा पाटील, दयारामभाऊ वानखडे, तहसीलदार समाधान सोनावणे, किरणबाप्पू देशमुख, शेख सुलतान उर्फ बुढन जमादार, साहेबराव कलोरे, कैलासबाप्पू देशमुख, निलेश घोंगे, राजू मसने आदींची उपस्थिती होती.

भोंगा उतरवयाचा कशाला?

जर भोंगा उतरविल्याने तुमचा विकास होत असेल, शेतकऱ्यांना (Farmer) त्यांच्या मालाला चांगले भाव मिळत असतील, गरिबांना घरे मिळत असतील तर भोंगा हा उतरवायला काहीच हरकत नाही. मात्र यातील काहीच होत नसेल तर भोंगा कशाला उतरवू? असा प्रश्न राज्‍यमंत्री बच्‍चू कडू यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com