Mithi river danger level crossed heavy rains Mumbai Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Mumbai Rain : पावसाचा हाहा:कार! मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली, एलबीएस मार्ग बंद, कुर्लामध्ये कमरेइतके पाणी; धडकी भरवणारा व्हिडिओ

Kurla LBS Marg closed due to waist-deep flooding : मुसळधार पावसामुळे मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, कुर्ला-बांद्रा परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अंधेरी, वडाळा, घाटकोपर, दादर, भांडूप आणि कुर्ला या भागांना मोठा फटका बसला आहे.

Namdeo Kumbhar

  • मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे.

  • मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडल्याने कुर्ला-बांद्रा परिसरात सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.

  • एल.बी.एस. मार्गावर कमरेहून अधिक पाणी साचल्याने रस्ते बंद झाले आहेत.

  • रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याने गाड्या २०-२५ मिनिटे उशिराने धावत असून प्रवाशांचे हाल होत आहेत.

Mithi river danger level crossed heavy rains Mumbai : मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली असून एकच हाहाकार उडाला आहे. अंधेरी, वडाळा, घाटकोपर, दादार, भांडूपसह कुर्लामध्ये पावासाने तडाखा दिला आहे. चार दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, कुर्ला-बांद्रा परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांनी भोंग्याद्वारे लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. कुर्ला येथील एल.बी.एस. मार्गावर कमरेहून अधिक पाणी साचल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कमानी परिसरात रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी भरले असून, काळे मार्ग ठप्प झाला आहे. जोरदार पावसामुळे कुर्लामधील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

कुर्ला रेल्वे स्टेशन, तिलकनगर आणि चेंबूर रेल्वे स्टेशन परिसरातही पाणीच पाणी आहे. रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने माहीम, माटुंगा आणि दादर परिसरातही रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे रेल्वे चालवणाऱ्यांना रुळांचा अंदाज घेणे कठीण झाले असून, रेल्वे सेवा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत. या परिस्थितीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण आहे. कुर्ल्यातील एल.बी.एस. मार्ग पाण्याखाली गेला असून, रस्ते बंद झाले आहेत. तसेच रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने ट्रेन सेवा २०-२५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मागील चार दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज मुंबई आणि ठाण्याला आज रेड अलर्ट लागू केला. शाळा, कॉलेज अन् महाविद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. खासगी कार्यलयालाही सुट्टी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हातात कोयता घेऊन तरुणाचा दहशत माजवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

DRI मुंबईची भव्य कारवाई; २३ कोटींचा ई-कचरा जप्त, मास्टरमाईंड अटक

Indian Railway: भारतातील एक असं रेल्वे स्टेशन, येथून देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यासाठी ट्रेन जातात

Floods: पावसाचा हाहाकार! एअरपोर्ट, शाळा- कार्यालय बंद; रस्ते ब्लॉक, नेपाळमध्ये २४ तासापासून मुसळधार

Dahisar Police : चेन स्नॅचिंग प्रकरणात सराईत चोरटा गजाआड, दहिसर पोलिसांनी मध्यप्रदेशमधून केली अटक

SCROLL FOR NEXT