Mumbai Fake FDA officer Raid saam tv
मुंबई/पुणे

Fake FDA officer: तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा गैरफायदा; FDA अधिकारी असल्याचे सांगत हॉटेलवर बनावट धाड, गुन्हा दाखल

Mumbai Fake FDA officer Raid: मुंबईतील एका हॉटेलमध्ये स्वतःला FDA अधिकारी सांगून तपासणी केल्याचा आरोप असलेल्या दोघांविरुद्ध बोरीवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हॉटेल मालकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळयुक्त आणि मुदतबाह्य अन्नपदार्थांविरोधात सुरू केलेल्या धडक कारवाईमुळे अनेक व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. या वातावरणाचाच गैरफायदा घेत काही जणांनी स्वतःला FDA अधिकारी असल्याचं सांगून हॉटेलवर धाड टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी हॉटेल व्यावसायिकाने बोरीवली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी विजय बबन जाधव 42 वर्ष स्वाती विक्रांत तुळसकर या दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 205, 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

यावेळी संबंधित महिलेने स्वतःकडे Food Corporation of India (FCI) आणि अन्न तपासणीशी संबंधित असल्याचे दर्शवणारे ओळखपत्र असल्याचं दाखवल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. मात्र हॉटेल मालकाला संशय आल्याने त्याने संबंधितांकडे अधिकृत आदेश आणि ओळखपत्रांची पडताळणी करण्याची मागणी केली. समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सरकारी अधिकारी असल्याचं भासवून फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित महिला आणमि पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDA कडून सुरू असलेल्या कठोर कारवाईमुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा गैरफायदा घेऊन बनावट अधिकारी बनून व्यावसायिकांना धमकावण्याचा प्रयत्न होत असल्याने व्यापाऱ्यांनी अशा व्यक्तींची ओळख आणि अधिकृत कागदपत्रांची खातरजमा करूनच सहकार्य करावं, असे आवाहन तपास यंत्रणांकडून करण्यात येतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते राहुल गांधींच्या समर्थनार्थ नागपूर शहरातील राजभवन चौकात आंदोलन

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर विरोधक ठाम, लाठीचार्जवरुन घमासान, संसद ठप्प

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT