MUMBAI DRUG CRACKDOWN: COCAINE WORTH ₹2.17 CRORE SEIZED IN MIRA ROAD AND NALASOPARA, TWO NIGERIAN NATIONALS DETAINED Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : मुंबईत ATS ची मोठी कारवाई! २ कोटींचे ड्रग्स जप्त; दोघांना बेड्या

Mumbai Crime News : मिरारोड आणि नालासोपारा येथे स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल २ कोटी १७ लाख रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले असून दोन नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Alisha Khedekar

  • मिरारोड आणि नालासोपारा येथे मोठी कारवाई

  • ATS कडून २ कोटी १७ लाख रुपयांचे कोकेन जप्त

  • दोन नायजेरियन नागरिकांना पोलिस आणि ATS ने ताब्यात घेतले

  • मिरारोडमध्ये २६१.५ ग्रॅम तर नालासोपाऱ्यात २७९ ग्रॅम कोकेन जप्त

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे, मिरारोड आणि नालासोपारा येथे स्वतंत्र कारवायांमध्ये तब्बल २ कोटी १७ लाख रुपयांहून अधिक किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले असून, दोन नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत पोलिस आणि दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठे यश मिळवले आहे. या कारवायांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अंमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा तपास अधिक वेगाने सुरू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या ATS चे पथक नयानगर परिसरात नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. यावेळी ईशा वाईन शॉपसमोर संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकावर पोलिसांची नजर गेली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून २६१.५ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत सुमारे ७८ लाख ४५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुद्ध नयानगर पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडे हे अमली पदार्थ कुठून आले याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, नालासोपारा पूर्वेतील प्रगती नगर परिसरात दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आणखी एक मोठी कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी हुसेन मार्क कॉपी (वय ३८) या नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २७९ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे १ कोटी ३९ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.

प्राथमिक तपासात हुसेन मार्क कॉपी हा पश्चिम आफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट (Côte d'Ivoire) देशाचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामागे मोठे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेट कार्यरत आहे का? याचा ATS आणि पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या दोन्ही कारवायांमुळे अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील यंत्रणांची सतर्कता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT