MNS protest in Mira Bhayandar  Saam TV News Marathi
मुंबई/पुणे

Mira Bhayandar Morcha : आंदोलनकर्त्यांची धरपकड, दिसेल त्या वाहानात डांबलं; पोलीस स्टेशनमध्ये जागा पुरेना, लोकांना बँक्वेट हॉलमध्ये ठेवले

Mira Bhayandar protest, Marathi vs Hindi issue : मीरा भाईंदरमध्ये मराठीसाठी मोर्चा काढण्यात आला. पोलिसांकडून अनेकांना ताब्यात घेण्यात आले. कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली.

Namdeo Kumbhar

Why was MNS protest in Mira Bhayandar denied permission : मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे मीरा भाईंदरमध्येमधील वातावरण चांगलेच तापले. मराठीच्या मुद्द्यावर मनसे, ठाकरेंची सेना आणि मराठी एकीकरण समितीकडून मोर्चा काढण्यात येणार होता. पण पोलिसांनी परवानगी नाकारली, मंगळवारी पहाटेच मनसे नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. पण कार्यकर्ते मोर्चावर ठाम राहिले. ठरलेल्या ठिकाणाहूनच मोर्चाला सुरूवात झाला आहे. मीरा भाईंदरमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चासाठी मराठी माणसं एकवटले आहेत. गुजराती व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून हा मोर्चा काढण्यात आलाय, पण या मोर्चाला परवानगी नाकारली अन् राज्यात संतापाची लाट उसळली. राज्य सरकार आणि पोलिसांवर टीका करण्यात आली. ठरलेल्या ठिकाणाहून मोर्चाला सुरूवात झाली, पण पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड सुर करण्यात आली आहे. पोलिसांनी इतक्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले की पोलीस स्टेशनमध्ये जागाच संपली आहे. पोलीस स्टेशन हाऊसफुल झाल्यामुळे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी बँक्वेट हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे.

मराठी आणि हिंदी हा वाद दिवसागणिक अधिक तीव्र होताना दिसत आहे. मीरा भाईंदरमधील मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्ते आणि नेत्यांना नोटीसा झाडल्या. पण सर्वजण मोर्चावर ठाम राहिल्यामुळे पोलिसांकडून धरपकड करण्यास सुरूवात झाली. त्यानंतर मीरा भाईंदर आणि परिसरातील वातावरण चांगलेच तापलेय. मोर्चाला शेकडो लोक रस्त्यावर उतरल्याचे व्हिडिओतून दिसत आहे.

मोर्चाच्या ठिकाणी मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. पोलिसांनी परवानगी नाकारली तर ठरलेल्या ठिकाणाहून बालाजी हॉटेल चौकातून मोर्चा निघाला आहे. मोर्चा सुरू होण्याआधी पोलिसांकडून बालाजी चौकात मोठा बंदोबस्त ठेवला होता. आंदोलकांना आले की गाडीत डांबले जात होते, पण आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पोलिसांनी बेस्टच्या बसमध्येही आंदोलनकर्त्यांना डांबले, त्याशिवाय रिक्षामध्येही घेऊन गेले. आंदोलनकर्त्यांची संख्या जास्त असल्यामुळे पोलीस स्टेशनमध्येही जागा शिल्लक राहिली नाही. पोलीस स्टेशन हाऊसफूल असल्यामुळे आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी बँक्वेट हॉलमध्ये ठेवले आहे.

मोर्चा निघण्याआधी आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी धरपकड सुरु केली होती. त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये जोरदार राडा पाहायला मिळायला. लोकांचा रोष आणि राजकीय विरोध पाहाता पोलिसांनी मोर्चाला अचानक परवानगी दिली, पण मार्ग बदलण्यास सांगण्यात आले. पण आंदोलनकर्ते आपल्या मार्गावर ठाम राहिले, ठरलेल्या ठिकाणाहूनच त्यांनी मोर्चा काढला आहे. पोलिसांकडून त्या मार्गावर मोर्चा काढण्यास परवानही नाकारण्यात आली आहे. बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशन या मार्गाने मोर्चा निघाला आहे. मनसे, ठाकरे गट आणि मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते झेंडे घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update : मनोज जरांगेंवर कारवाईची मागणी; धनंजय मुंडेंना ओबीसी कार्यकर्त्यांचा दुग्धाभिषेकाने समर्थन

Couple Kiss in Car : कारमध्ये गर्लफ्रेंडला किस करणं गुन्हा आहे का?

शिरूरमध्ये बिबट्याची दहशत, जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल|VIDEO

SCROLL FOR NEXT